मुंबई
जेएसडब्ल्यू समुहातील कंपनी जेएसडब्ल्यू इंफ्रास्ट्रक्चर यांचा समभाग राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) 20 टक्के प्रिमियमसह मंगळवारी सूचीबद्ध झाला आहे. 119 रुपये इशू किंमत असताना कंपनीचा समभाग 143 रुपयांवर एनएसईवर खुला झाला आहे. समभाग लिस्टिंग झाल्यानंतर जवळपास 32 टक्के इतकी वाढ समभागाने दर्शवली होती. जेएसडब्ल्यूच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी 37 टक्के इतका प्रतिसाद दिला होता. पात्रताधारक संस्थात्मक खरेदीदारांनी सदरचा आयपीओ 60 पट सबस्क्राईब केला आहे.