कैद्यांचे विविध उपक्रम पाहून उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी. विराप्पा यांनी केले कौतुक : कारागृहातील स्वयंपाकगृह, बराकीची केली पाहणी
प्रतिनिधी / बेळगाव
हिंडलगा येथील कारागृहाला उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि कर्नाटक राज्य कायदा सेवा प्राधिकारचे चेअरमन बी. विराप्पा यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी स्वयंपाक घराची पाहणी केली. जेवण चांगले आहे मात्र स्वच्छता ठेवा, अशी सूचना त्यांनी कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांना केली.
गुरुवारी सकाळी अचानकपणे न्यायाधीशांनी भेट दिली. यावेळी कारागृहातील साऱयाच अधिकाऱयांची तारांबळ उडाली. स्वयंपाकगृह तसेच कैद्यांच्या बराकीकडे न्यायाधीशांनी धाव घेतली. यावेळी मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांनी त्यांना सर्व माहिती दिली. स्वयंपाकघरासाठी निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे लवकरच काम सुरू केले जाईल, असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यपूर्व काळातील हे कारागृह आहे. तरी देखील कारागृहाच्या अधिकाऱयांनी केलेली स्वच्छता पाहून न्यायाधीशांनी समाधान व्यक्त केले.
स्वयंपाकगृहामध्ये जाऊन शिजलेला भात आणि तयार करण्यात आलेल्या सांबाराची त्यांनी चव घेतली. यावेळी त्यांनी जेवण चांगले आहे. मात्र थोडीशी अजूनही स्वच्छता ठेवा, असे सांगितले. भाकरी मात्र जमिनीवर होत्या. त्यामुळे त्या भाकरी जमिनीवर ठेवू नका. त्यासाठी एखादे कपाट करा. त्या ठिकाणी तुम्ही भाकरी ठेवण्याची व्यवस्था करा, अशी सूचना त्यांनी केली.
कारागृहातील स्वच्छता पाहून त्यांनी अधिकाऱयांचे कौतुक केले. त्यांनी कारागृहामध्ये असलेल्या गौतमबुद्धांच्या पुतळय़ांचे दर्शन घेतले. त्या ठिकाणी पूजा केली. गौतमबुद्धांची मूर्ती आणि तेथील स्वच्छ परिसर पाहून न्यायाधीशांनी कृष्णकुमार यांचे कौतुक केले. न्यायालयामध्ये अशाप्रकारे पूजाअर्चा तसेच स्वच्छता केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
टेलर आणि फर्निचर काम करणाऱयांचे कौतुक
अनेकजण टेलर काम करत असलेले पाहून न्यायाधीशांनी त्यांचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांचे गणवेश, एनसीसी विद्यार्थ्यांचा गणवेश याचबरोबर इतर कपडे शिवलेले पाहून न्यायाधीश देखील चकीत झाले. उत्तमप्रकारे शिलाई केलेले कपडे पाहून त्यांनी त्या कैद्यांचे कौतुक केले. तुम्हाला काय अडचण आहे ते सांगा असे विचारले. यावर अनेक कैद्यांनी खटल्यामध्ये निर्माण झालेल्या अडचणींची माहिती दिली. त्यावर निश्चितच तुम्हाला स्वतंत्र वकील देऊ, असे त्यांनी सांगितले.
कारागृहामध्ये असलेल्या जुन्या इमारतींचे लाकूड काढून ते लाकूड फर्निचर कामाला वापरले होते. बेड, दिवाण आणि इतर साहित्य त्यामधून तयार केले जात होते. उत्तमप्रकारे कारागिरी करण्यात आल्याचे पाहून न्यायाधीशांनी समाधान व्यक्त केले.
महिला कैद्यांची केली विचारपूस
महिला कैद्यांच्या विभागाला न्यायाधीश बी. विराप्पा यांनी भेट दिली. यावेळी एका महिला कैद्याचे बाळ पाहून न्यायाधीश भावूक झाले. यावेळी त्यांनी कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांना त्या बाळाची काळजी घ्या, अशी सूचना केली. याचबरोबर एका वृद्ध महिलेची अवस्था पाहून देखील त्यांनी संबंधित महिलेला योग्य उपचार करून तिला न्याय मिळेल याबाबत प्रयत्न करा, असे त्यांनी सांगितले.
शिक्षा झाल्यानंतर एका महिलेची कारागृहातच प्रसुती झाली. लहान मुलगी असून देखील ती कारागृहात कशी? अशी विचारणा केली. त्यावर कारागृहाच्या अधिकाऱयांनी संबंधित महिलेच्या गुह्याबाबतची माहिती दिली. ज्या कोणाला वकील हवा आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, निश्चितच तुम्हाला वकील देऊ, असे स्पष्ट केले.
कारागृहामध्ये केवळ एकच डॉक्टर आहे. तेव्हा आणखी किमान दोन ते तीन डॉक्टरांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱयांना याची माहिती द्यावी आणि या ठिकाणी आणखी तीन डॉक्टरांची नेमणूक करावी, अशी मागणी कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांनी न्यायाधीशांकडे यावेळी केली.
मंजुनाथ याचे केले विशेष कौतुक
शिक्षा झाली. मात्र न डगमगता आपली कला जोपासून मंजुनाथ याने काढलेली चित्रे पाहून न्यायाधीश बी. विराप्पा यांनी त्याचे विशेष कौतुक केले. यावेळी मंजुनाथ याने काढलेली श्रीकृष्णाची कलाकृती पाहून ते मोहीत झाले. यावेळी हवी तर तुम्ही ही कलाकृती घ्या, असे मंजुनाथ याने म्हटले. त्यावेळी मला मोफत देत असाल तर नको त्याची काय किंमत आहे ती माझ्याकडून घ्या आणि मला ती कलाकृती द्या, असे सांगितले.