Tarun Bharat

मंगळवारी पावसाची केवळ रिपरिप

Advertisements

मात्र अजूनही पूरपरिस्थिती कायम; अधूनमधून सरी : मागील तीन दिवसांमध्ये 91.10 मि. मी. पावसाची नोंद

प्रतिनिधी /बेळगाव

रविवारी व सोमवारी जोरदार पावसानंतर मंगळवारी मात्र पावसाने काहीशी उसंत घेतली होती. दुपारनंतर केवळ अधूनमधून सरी कोसळल्या. मात्र पावसाला जोर कमी राहिल्यामुळे साऱयांनाच दिलासा मिळाला. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. या पावसाने जनजीवन विस्कळीत केले होते. मात्र मंगळवारी पावसाने उसंत घेतल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले आहे. मात्र काही नद्यांना आणि नाल्यांना आलेला पूर अजूनही ओसरला नाही. सोमवारी 50.5 मि. मी. तर मंगळवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 3.2 मि. मी. पावसाची नोंद झाली. 

दोन दिवसांपासून पावसाने शहरासह ग्रामीण भागाला झोडपून काढले. या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेकांना स्थलांतरित करावे लागले तर अनेकांची घरे कोसळली आहेत. यावषी झालेल्या पावसामुळे शहरासह उपनगरांमध्ये सर्वत्र पाणी साचून राहिले होते.  त्यामुळे जीवनावश्यक वस्तू तसेच इतर साहित्य खराब झाले आहे. पावसामुळे नाले तुडुंब भरून वाहत होते. अनेक शिवारांमध्ये पाणी साचल्यामुळे पिके पाण्याखाली गेली आहेत. अजूनही बळ्ळारी नाला आणि मार्कंडेय नदीला पूर तसाच आहे. पावसामुळे शहरातील दहाहून अधिक घरांची पडझड झाली आहे. सोमवारीच चार ते पाच घरे कोसळली होती. त्यामधील चार घरांना नुकसानभरपाई देण्यात आली. मात्र अजूनही काही ठिकाणी घरे कोसळली आहेत.

मोहरम असल्यामुळे सर्व सरकारी कार्यालये, शाळा व इतर संस्थांना सुटी होती. त्यामुळे बाजारपेठेतही वर्दळ कमी होती. पावसाने उघडीप दिली तरी ग्रामीण भागातील जनता मात्र शहराकडे फिरकली नाही. मंगळवारीही केशवनगर, अन्नपूर्णेश्वरीनगर या परिसरात पाणी साचून होते. बळ्ळारी नाल्यालाही अधिकच पाणी आले आहे. त्यामुळे भातपीक पाण्याखाली गेले असून कुजण्याची भीती व्यक्त होत आहे.

या पावसामुळे अनेक रस्ते उखडले असून काही ठिकाणी पाणी साचून आहे. गटारीतील कचरा रस्त्यावरच पसरला होता. स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा बोजवारा पावसाने उघडा पाडला आहे. खडी उखडल्यामुळे तसेच मोठे खड्डे पडल्यामुळे वाहने चालविणे कसरतीचे बनले आहे. स्मार्ट सिटीची कामे  पूर्णपणे दर्जाहीन झाल्याचे यावरून दिसत आहे.

बेळगावला उद्यापर्यंत यलो अलर्ट

दमदार पावसामुळे गटारी तुडुंब भरून वाहताना कचरा बाहेर पडला आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. आरपीडी क्रॉस येथे बऱयाच दिवसांपासून डेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यातच पावसाचे पाणीही मिसळल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे वाहनचालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गुरुवार दि. 11 पर्यंत बेळगावला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी पाऊस कमी होणार की वाढणार? हे पहावे लागणार आहे.

गेल्या तीन दिवसांमध्ये 91.10 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी रात्री 8.30 ते रविवारी सकाळी 8.30 पर्यंत 38.2 मि. मी. तर रविवारी रात्री 8.30 ते सोमवारी सकाळी 8.30 पर्यंत 50.5 मि. मी. पावसाची नोंद झाली. मंगळवारी सायंकाळी 6 पर्यंत 3.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

Related Stories

हलगा येथे गवतगंजीला शॉर्टसर्किटमुळे आग

Amit Kulkarni

13 वर्षांपासून सुरू असलेला हलगा-मच्छे रस्त्याचा लढा

Amit Kulkarni

गोडची, वीरभद्र यात्रा साध्या पध्दतीने

Patil_p

यश साधण्यासाठी आव्हानांना तोंड देणे आवश्यक

Patil_p

नीना स्पोर्ट्स, टॅलेंट हुबळी, भटकळ स्पोर्ट्स क्लब संघ विजयी

Amit Kulkarni

यंग चॅम्प्स शास्त्रीनगर संघाकडे एसआरएस चषक

Amit Kulkarni
error: Content is protected !!