हिमाचल प्रदेशातून दिल्लीत केले एअरलिफ्ट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एम. आर. शाह यांना छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर गुरुवारी हिमाचल प्रदेशातून दिल्लीत एअरलिफ्ट करण्यात आले. त्यांच्या स्वीय सचिवाने दिलेल्या माहितीनुसार, शाह हिमाचल प्रदेशमध्ये असताना त्यांना छातीत दुखू लागले. अचानक प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना विमानाने दिल्लीला परत आणण्याची व्यवस्था करण्यात आली. न्यायमूर्ती एम. आर. शाह यांच्या प्रकृतीचे गांभीर्य पाहून सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा त्यांच्या निकटवर्तीयांच्या संपर्कात आहेत. त्याचबरोबर केंद्रीय गृह मंत्रालयाचे वरि÷ अधिकारीही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
न्यायमूर्ती शाह यांच्या प्रकृतीबाबत सुरुवातीला त्यांच्या वैयक्तिक सचिवांनी माहिती दिली. त्यानंतर न्यायमूर्ती शाह यांचे वक्तव्यही समोर आले. ‘मी ठीक आहे. काळजी करण्यासारखे काहीही नाही. मी लवकरच दिल्लीला पोहोचेन’ असे त्यांनी स्पष्ट केल्याने दिलासा मिळाला आहे.