मिलान-इटली : पहिल्या टप्प्यात एका गोलची आघाडी घेतलेल्या युवेन्ट्सने फ्लोरेन्टिनाविरुद्ध तोच धडाका कायम राखत कोपा इटालिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. दुसऱया टप्प्यातील लढतीत युवेन्ट्सने आणखी 2 गोल नोंदवले आणि 3-0 असा ऍग्रिगेट विजय मिळवला. येथील दुसऱया टप्प्यातील लढतीत युवेन्ट्सतर्फे फेडेरिकोने 32 व्या मिनिटाला तर डॅनिलोने जादा वेळेतील चौथ्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल नोंदवला. आता अंतिम लढतीत युवेन्ट्सचा मुकाबला इंटरमिलानविरुद्ध 11 मे रोजी होईल. जेतेपदाची ही निर्णायक लढत रोममध्ये रंगणार आहे. युवेन्ट्सने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही 21 वी वेळ आहे.
Previous Articleराज्यात 1,076 केंद्रांवर बारावी परीक्षा
Next Article मध्यरात्री देवगिरी एक्स्प्रेसवर सशस्त्र दरोडा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.