प्रतिनिधी /बेळगाव
कलाश्री स्टील बंब आणि स्टील फर्निचर आयोजित आठव्या सोडतीत खानापूर तालुक्यातील दोड्डहोसूर येथील ज्योती देवलतकर या 35 हजार रुपयांच्या बक्षिसाच्या मानकरी ठरल्या.
उद्यमबाग येथील कलाश्रीच्या सभागृहात आयोजित केलेल्या आठव्या लकीड्रॉ सोडतीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून गोपाळ महाराज हलसी, रोटरी क्लब दर्पनच्या अध्यक्षा आशा पाटील, मुक्ता नावले, शिला पाटील इदलहोंड, रोटरी क्लबचे डॉ. विजयकुमार पुजार व कलाश्रीचे संस्थापक प्रकाश डोळेकर व सुरेश रेडेकर आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते सोडतीचे बक्षीस काढण्यात आले. ज्योती देवलतकर यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी रविंद्र आर्य, शिवानंद मोगलीहाळ, रुपाली जनाज, सतीश नाईक, दीपक केरकर, एम. व्ही. हुल्यापगोळ आदी उपस्थित होते. नारायण मन्नोळकर महाद्वाररोड, प्रतीक्षा साळुंखे मजगाव, सुनील महाजन हिंडलगा, रोहित पेडणेकर कोनवाळ गल्ली, प्रांजल प्रवीण खामकर भाग्यनगर यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. 4 ते 4.30 या वेळेत उपस्थित असलेल्या सभासदांना प्रति किलो 35 रुपये प्रमाणे साखर देण्यात आली.