वार्ताहर /खानापूर
श्री साई कृष्ण सेवा प्रतिष्ठान खानापूर चे संस्थापक अध्यक्ष व शिवसेनेचे राज्य उपाध्यक्ष के. पी.पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दि.10 रोजी दुपारी 3 वाजता श्रीमान के. पी.पाटील नगर गर्लगुंजी रोड बरगांव येथील श्री साई मंगल कार्यालयाच्या आवारात भव्य कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या आखाड्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे विरुद्ध कळंबजीत पंजाब यांच्यात होणार आहे. द्वितीय क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार विरुद्ध राकेश कुमार पंजाब यांच्यात, तिस्रया क्रमांकाची कुस्ती कालीचरण सोळणकर कोल्हापूर विरुद्ध किर्ती कुमार कार्वे ता.कंग्राळी यांच्यात होणार आहे. तर अन्य नियोजित 41 कुस्त्या होणार आहेत. आखाड्याच्या उदघाटन कार्यक्रमासाठी महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध क्षेत्रातील मान्यवर, कुस्ती संघटनेचे व शिवसेनेचे पदाधिकारी, श्री साई कृष्ण सेवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते,के. पी. पाटील अभिमानी समर्थक कार्यकर्ते व कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यावेळी खानापूर तालुक्यातील माजी पैलवानांचा सत्कार करण्यात येणार आहे. कुस्ती आखाडा पाहण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीमान के.पी.पाटील यांनी केले आहे.