वृत्तसंस्था/ चेन्नई
2022-23 च्या इंडियन सुपर लिग फुटबॉल हंगामासाठी केरळचा फुटबॉलपटू के. प्रशांत बरोबर चेन्नईन एफ सी संघाने एक वर्षासाठी नवा करार केला आहे.
कोझिकोडेच्या 25 वर्षीय के. प्रशांतने यापूर्वी इंडियन सुपर लिग हंगामात 5 वर्षे केरळ ब्लास्टर्स एफसी संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. प्रशांतने आपल्या वैयक्तिक फुटबॉल कारकीर्दीत 76 सामने खेळले आहेत. भारताच्या 17 वर्षाखालील आणि 19 वर्षाखालील वयोगटाच्या संघामध्ये प्रशांतचा समावेश होता.