Tarun Bharat

कासच्या जंगलात पर्यटकांना मिळणार नाईट सफारीचा आनंद

वार्ताहर / कास :

आपल्या अलौकिक निसर्ग सौंदर्याने जगभरातील पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या कासच्या जंगलात (kaas forest) पर्यटकांना आता नाईट सफारीचा (night safari) आनंद लुटता येणार आहे.

कास पठार हे पश्चिम घाटातील सर्वात जास्त जैवविविधता असणारे ठिकाण आहे. युनोस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समाविष्ट असलेले कास पठार रंगीबेरंगी फुलांच्या गालिच्छांसाठी प्रसिद्ध आहे. येथे जून ते ऑक्टोबर दरम्यान विविध दुर्मिळ व रेड डाटा बुकमधील अतिदुर्मिळ प्रजातींच आयुष्य फुलत. फुलांबरोबरच येथील घनदाट जंगलात हजारो प्रकारची विविध वृक्षसंपदा विपुल प्रमाणात आहे. या वृक्षसंपदेमुळे येथील प्राणीजीवन समृद्ध आहे. येथील जंगलात बिबटय़ा, अस्वल, सांबर, रानकुत्री, साळींदर, रानडुक्कर, भेकर, पिसोरी, रानगवे, खवले मांजर, काळींदर, कोल्हे, रानगवे, ससे, रानकोंबडे मोर लांडोरी वानर माकड अशी प्राणीसंपदा पाहायला मिळते. तसेच विविध जातींचे पक्षी, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे ईत्यादी वनसंपदा ही मोठय़ा प्रमाणात आहे. याच विपुल निसर्ग संपदेच दर्शन पर्यटकांना या जंगल सफारीच्या माध्यमातून कास पठार कार्यकारी समिती व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे. फक्त फुलांच्या हंगामात कास पठारावर लाखो पर्यटकांची वर्दळ असते पन ईतर वेळी पर्यटक संख्या कमी होत असल्याने स्थानिकांना रोजगार व बारमाही पर्यटन ही संकल्पना लक्षात घेऊन उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली या नाईट सफारीचे नियोजन करण्यात आले आहे.

या नाईट सफारीसाठी दोन गाडय़ा तयार करण्यात आल्या असून एकावेळी आठ जणांना यामध्ये बसता येणार आहे. पूर्णपणे मोकळय़ा असलेल्या गाडीत उंचावर आसनव्यवस्था करण्यात आली असून, आजूबाजूला सर्व परिसर दृष्टीस पडणार आहे. सोबत कास कार्यकारी समितीचे गाईड व सुरक्षाव्यवस्था असणार आहे. पर्यटकांना जास्तीत जास्त भाग दाखवण्याबरोबर सुरक्षेची काळजी घेतली जाणार आहे. या जंगल सफारीच्या बुकींग साठी वनविभागाच्या www.kas.ind.in या वेबसाईटवर बुकींग सुविधा उपलब्ध असणार आहे. पहिल्याच दिवशी जंगलसफारीचा कोणत्या पर्यटकांना बुकींग करून आनंद लुटण्याचा मान मिळणार याकडे ही लक्ष लागून राहीले आहे.

असा असेल मार्ग – कास पठार कार्यालयापासून सफारीची सुरूवात होवून घाटाई फाटा – घाटाईदेवी मंदिर – वांजुळवाडी मार्गे कास तलाव. तेथून कास गावाच्या पुढील तांबी फाटय़ातून आत जाऊन पाली, तांबी, धावली, जुंगटी गावातून निबीड अशा कात्रेवाडी जळकेवाडी गावापर्यंत गाडय़ा जाणार आहेत. कात्रेवाडी येथील वनविभागाच्या टेहळणी मनोर्यावरून पाहणी करून पुन्हा गाडय़ा माघारी फिरतील. पुनः तांबी फाटय़ावरून अंधारी गावातून सह्याद्रीनगर या ठिकाणी सफारी येईल. येथील परिसर दर्शन करून कुसुंबीमुरा-एकीव मार्गे पुन्हा गाडय़ा मूळस्थानी कास पठारावर येतील. सायंकाळी सात वाजल्यापासून पुढे स्थानिक परिस्थिती पाहून नाईट सफारी चालू होणार आहे.

Related Stories

97.15 टक्के लोक होताहेत घरीच बरे

datta jadhav

सातारा : कुसुंबी मुऱ्यातील आखाडे वस्तीवर पाणी टंचाईचे संकट

datta jadhav

मोती तळय़ाची होणार स्वच्छता

Patil_p

सातारा तालुक्यातील 4 बाधितांचा मृत्यू

Patil_p

वाई तालुक्यात नव्याने 81 जण बाधित

Patil_p

जनावरांच्या लसीकरणाची मोहीम अंतिम टप्प्यात

datta jadhav