Tarun Bharat

माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांना धक्का, राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षांचा भाजपात प्रवेश

Kolhapur Political News : आमदार हसन मुश्रीफांना (Hasan Mushrif) समरजित घाटगे यांचा मोठा धक्का दिला आहे. कागलच्या एका नगराध्यक्षांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विद्यमान नगराध्यक्षा माणिक माळी आणि माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी हे पती पत्नी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे समरजित घाटगे (Samarjeetsinh Ghatge) यांनी राष्ट्रवादीला पाडलं खिंडार पाडलं आहे. उपनगराध्यक्ष आनंदा पसारे यांचीनी राष्ट्रवादीला सोडचिठी दिली. समरजितराजे घाटगे यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कागल शहराच्या नगराध्यक्षा सौ. माणिक माळी व त्यांचे पती कागलचे माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.भाजपचे जिल्हाध्यक्ष व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी त्यांचे भाजपमध्ये कोल्हापुरातील नागाळा पार्कातील निवासस्थानी स्वागत केले. यानंतर रमेश माळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रमेश माळी म्हणाले, मी माझ्या मूळ घरात परत आलो आहे. मला कोणताही संकोच वाटला नाही. मला कधी मुश्रीफ गटात स्वातंत्र्य मिळालं नाही.

माणिक माळी या पाच वर्षांपूर्वी कागल नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्षा म्हणून माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या गटातून नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या आहेत. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुश्रीफ गटातून राजे गटात केलेला प्रवेश म्हणजे मुश्रीफ गटाला मोठा धक्का मानला जात आहे. याआधी मुश्रीफ गटातून राजे गटात माजी नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष आनंदा पसारे,संतोष सोनुले यांनीही प्रवेश केला आहे. कागल शहर हे आमदार हसन मुश्रीफ यांचे होमग्राउंड आहे.

Related Stories

राज कुंद्रांच्या अडचणी वाढल्या?; चार कर्मचारी बनणार मुख्य साक्षीदार

Archana Banage

`बैतुलमाल’चा पुरग्रस्त ३ गावांना मदतरुपी आधार

Archana Banage

इंदौरमध्ये ग्रीन फंगसचा पहिला रुग्ण

datta jadhav

हातनोली येथे वादळी वाऱ्याने घराची भिंत कोसळून एक महिला ठार

Archana Banage

मनपा प्रभाग रचनेबाबत आज निर्णय?

Archana Banage

अनुष्का शर्माला आली विराटची आठवण; सोशल मिडियावर भावनिक पोस्ट

Archana Banage