Tarun Bharat

कै.भाईसाहेब सावंत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा 13 ऑगस्टला

Advertisements

सावंतवाडी / प्रतिनिधी –

शिक्षण प्रसारक मंडळ,सावंतवाडी संचलित राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सावंतवाडीच्यावतीने शनिवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 10 वाजता राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर काॅलेजच्या सभागृहात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यावर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तसेच कै.नामदार भाईसाहेब सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाणार आहे.सदर स्पर्धा सिंधुदुर्गातील ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी असून सदर स्पर्धेसाठी ज्युनियर कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा संघ किंवा वैयक्तिक एका विद्यार्थ्याला सहभागी होता येईल. सदर स्पर्धेसाठी सांघिक विजेतेपद प्राप्त करणाऱ्याला फिरता चषक तसेच प्रथम क्रमांक रोख रू 3000 चषक व प्रमाणपत्र,द्वितीय क्रमांक रोख रू 2000 चषक व प्रमाणपत्र ,तृतीय क्रमांक रोख रू 1000 चषक व प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ दोन क्रमांकाना रोख रू 500 व प्रमाणपत्र देण्यात येईल. तरी या वक्तृत्व स्पर्धेत सिंधुदुर्गातील बहुसंख्य ज्युनियर कॉलेजनी सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. विकास भाई सावंत, राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक श्री.जे व्ही धोंड, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक- धुरी तसेच स्पर्धा समिती प्रमुख प्रा. केदार म्हसकर यांनी केले आहे.

Related Stories

रत्नागिरी : थरारक पाठलागानंतर बिबट्याच्या तावडीतून वासराची सुटका

Abhijeet Shinde

“हर घर झेंडा” तर सामाजिक बांधिलकीचा “हर बेड टेबल” उपक्रम

Ganeshprasad Gogate

काजू बीच्या घटत्या दरामुळे चिंता

NIKHIL_N

इस्लामपूरची ‘एक्सपायरी डेट’ प्रथम

NIKHIL_N

सीमाभागातील 197 विद्यार्थ्यांनी दिली दहावीची परीक्षा

NIKHIL_N

राजापुरात बालकाला पोलिओसदृश लक्षणे

Patil_p
error: Content is protected !!