रेवती यांच्याकडून चित्रपटाचे दिग्दर्शन
अभिनेता अजय देवगणला अलिकडेच राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता त्याची पत्नी आणि ख्यातनाम अभिनेत्री काजोलने स्वतःच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. सलाम वेंकी हा चित्रपट रेवती यांनी दिग्दर्शित केला आहे.


काजोलने या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. ‘सलाम वेंकी’ हा चित्रपट 9 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत असल्याचे तिने म्हटले आहे. सलाम वेंकी हा चित्रपट जीवनातील आव्हानांना सामोरे जाताना एका आईच्या अविश्वसनीय शक्तीच्या खऱया घटनेवर आधारित आहे.
रेवती यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटाची निर्मिती सूरज सिंह, श्रद्धा अग्रवाल आणि वर्षा कुकरेजा यांनी केली आहे. याचबरोबर बीलाइव्ह आणि रीटेक स्टुडिओजकडूनही निर्मितीत सहकार्य लाभले आहे. काजोल याचबरोबर डिस्ने प्लस हॉटस्टारची सीरिज ‘द गुड वाइफ’मधून ओटीटी पदार्पण करणार आहे.