Tarun Bharat

कळंगुटचे पंचायत सचिव रघुवीर बागकर यांची उचल बांगडी

प्रतिनिधी /म्हापसा

कळंगूट पंचायत क्षेत्रात माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांना हाताशी धरून पंचायतीचे सचिव रघुवीर बागकर यांनी येथे मोठय़ा प्रमाणात हातमिळवणी करीत विविध कामाना परवानगी देत प्रशासनास गैरकृत्य करण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप परशुराम गोमंतक सेनेच्या वतीने शैलेंद्र वेलिंगकर यांनी केल्यावर त्याची दखल घेत राज्य सरकारने कळंगुटचे सचिव रघुवीर बागकर यांची अन्यत्र बदली केली असून त्यांच्याजागी भेलदास कारापूरकर यांना आणण्यात आले आहे.

वेलिंगकर यांनी पणजीत पत्रकार परिषद घेऊन कळंगुटचे माजी सरपंच यांच्यावर आरोप करीत तत्कालीन सचिव रघुवीर बागकर यांच्या सहकार्याने विविध बेकायदेशीर कामाना प्रोत्साहन दिले होते. तसेच पाईन ट्रीचे मालक सावियो गोन्साल्वीस व अन्य पंच सदस्य तसेच विद्यमान सरपंच शॉन मार्टीन्स व पंच सदस्य बेकायदेशीर कृत्यात गुंतले असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला होता याची दखल घेत सरकारने अखेर रघुवीर बागकर यांची उचल बांगडी केली.

Related Stories

किनारपट्टी राज्यातून निर्यात व्यवहारांना चालना देणार

Amit Kulkarni

स्व.भाऊसाहेब बांदोडकर मैदानाला विकासाचा नवा साज

Amit Kulkarni

म्हादई निरीक्षणासाठी त्रिसदस्यीय समिती

Amit Kulkarni

‘जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स’चे मडगावात उद्घाटन

Patil_p

पेडणे भगवती मंदिरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे विसर्जन

Amit Kulkarni

पर्यटन व्यवसायाला पुन्हा अच्छे दिन

Amit Kulkarni