Tarun Bharat

मडगावात कलारंग महोत्सव- 2022

Advertisements

पद्ममिनी कोल्हापुरे खास आकर्षण : 6 ते 10 ऑक्टोंबर पर्यंत चालणार महोत्सव

प्रतिनिधी /मडगाव

‘कलांगण’ या कला केंद्राला यावषी 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने गुरुवार 6 ऑक्टोबर ते सोमवार 10 ऑक्टोबर या कालावधीत रवींद्र भवन, मडगाव येथे ‘कलारंग’ महोत्सव होणार आहे. कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन प्रख्यात चित्रपट अभिनेत्री पद्ममिनी कोल्हापुरे यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन सोहळय़ाला मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई उपस्थित राहणार आहेत.

पद्ममिनी कोल्हापुरे ही एक लोकप्रिय भारतीय चित्रपट अभिनेत्री तसेच एक गायिका आहे. पद्ममिनी कोल्हापुर प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील तिच्या भूमिकासांठी लोकप्रिय आहे. अगदी लहान वयात 7 वर्षांची असताना तिने आपल्या अभिनयाला सुरवात केला होती. तिच्या सुरुवातीच्या अभिनयामध्ये ‘इश्क इश्क इश्क’, ‘जिंदगा’r, ‘ड्रीम गर्ल’ आणि राज कपूरचा ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटांचा समावेश होता. इन्साफ का तराजू, प्रेम रोग, सौतेन, विधाता, प्यार झुकता नहीं, आहिस्ता आहिस्ता यांसारख्या चित्रपटांमधील भूमिका तिच्या प्रचंड लोकप्रिय ठरल्या होत्या. तिला 3 फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

कलांगणची भरारी…

गोव्याच्या व्यावसायिक राजधानीत कलेचा प्रचार करण्याच्या उद्देशाने मडगाव येथे 1997 मध्ये कलांगण केंद्र सुरू करण्यात आले होते. ज्यामध्ये सुरवातीला केवळ 40 विद्यार्थी होते. कलांगण ही भरतनाटय़म, तबला, हार्मोनियम आणि हिंदुस्थानी गायन यांचे नियमित वर्ग घेणारी संस्था आहे. आता त्यांच्या विद्यार्थ्यांची संख्या 600 पेक्षा जास्त आहे. 1997 मध्ये डॉ. गिरीश कर्नाड यांच्या हस्ते कलांगणचे उद्घाटन करण्यात आले होते.

कला आणि संस्कृती संचालनालय आणि रवींद्र भवन मडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कलांगण दरवषी मडगाव येथे ‘कलारंग’ हा नृत्य, संगीत आणि नाटय़ महोत्सव आयोजित करतो. गोव्यात होणाऱया महोत्सवापैकी हा एक प्रमुख महोत्सव बनला आहे. हा महोत्सव पाच दिवसांचा असतो. नृत्य, संगीत आणि नाटय़ एकत्र सादर करणारा हा भारतातील एकमेव महोत्सव आहे आणि मडगाव येथील महोत्सवाचे हे 20वे वर्ष आहे.

कलारंग महोत्सवात पं. हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद अमजद अली खान, डॉ. एल. सुब्रमण्यम, पं. उल्हास कशाळकर, किशोरी आमोणकर, शोभा मुदगल, डॉ. प्रभा अत्रे, पं. बिरजू महाराज, लीला सॅमसन, माधवी मुदगल, हेमा मालिनी, पद्मा तळवलकर, राहुल शर्मा, नसीरुद्दीन शाह, रजित कपूर, अनुपम खेर, परेश रावल, सुलभा आर्या, रीमा लागू इत्यादी कलाकारांनी या महोत्सवाला उपस्थिती लावली आहे.

गुरुवार, 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.15 वाजता पद्ममिनी कोल्हापुरे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून त्यानंतर रवींद्र चारी आणि समूह यांच्या ‘सतार सिंफनी’चा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांचे गायन, त्यानंतर शर्वरी जमेनिस व समूह यांचे कथ्थक नृत्य, शनिवार, 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वा. नितेश सावंत यांचे गायन, त्यानंतर डॉ. सुचेता भिडे चापेकर यांचे भरतनाटय़म सादरीकरण होईल. रविवार 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.00 वाजता हिंदी नाटक Kknock Kknock आणि सोमवार 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वा. संदेश कुलकर्णी, अमित फाळके आणि अमृता सुभाष (गल्ली बो) यांच्या प्रमुख भूमिका असलेले ’पुनश्?चा हनिमून’ हा मराठी नाटय़प्रयोग सादर केला जाणार आहे.

हा महोत्सव संपूर्ण उत्सवात लहान मुलांशिवाय सर्वांसाठी खुला आहे आणि 8 वर्षांखालील मुलांना नाटय़ प्रयोग पाहण्याची परवानगी नाही.

Related Stories

जमिनीच्या वादावरून दोन गटांत हाणामारी

Amit Kulkarni

वर्षभरात कोरोनाच्या लढय़ात गोवेकरांनी जास्तीत जास्त बुद्धी मिळविली

Amit Kulkarni

राज्यात काही भागात तुरळक सरी

Omkar B

आता ओडिसातून लाखो रुपयांचा गुटखा गोव्यात

Amit Kulkarni

खडी क्रशर, कचरा शेड व सचिवांच्या गैरव्यवहाराचा मुद्दा बेतोडा ग्रामसभेत गाजला

Amit Kulkarni

काँग्रेसचे धोरण सामान्य लोकांपर्यंत पोहोचवा

Amit Kulkarni
error: Content is protected !!