सजविलेल्या बैलजोडय़ांचा मिरवणुकीत सहभाग
वार्ताहर /हलगा
हलगा येथील कलमेश्वर देवस्थानची यात्रा मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे झाली नव्हती. परंतु यावर्षी कोरोनाचे संकट कमी झाल्याने यात्रा मोठय़ा उत्साहात मंगळवार दि. 19 एप्रिल रोजी झाली. मंगळवारी पहाटे मंदिरात अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सजविलेल्या बैलजोडय़ांची व गाडय़ांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गुलालाच्या उधळणीत व डॉल्बीच्या तालावर तरुणाई जल्लोषात नाचत होती.
मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी 7 नंतर कलमेश्वर मंदिरसमोर महादेवाच्या गजरात भव्य असा इंगळय़ांचा कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.