Tarun Bharat

महाराष्ट्रातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी कमलनाथ नियुक्त

Advertisements

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

शिवसेना नेते आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाचे प्रतिसाद दिल्लीतही उमटत असून या घडामोडींमुळे काँगेस पक्ष सावध झाला आहे. राज्यातील काँगेस आमदारांवर लक्ष ठेवण्यासाठी, तसेच राजकीय घडामोडींचा परामर्श घेण्यासाठी कमलनाथ यांची नियुक्ती काँगेस पक्षाच्या श्रेष्ठींनी केली आहे. कमलनाथ महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँगेस आणि काँगेस यांचे महाविकास आघाडी  सरकार आहे. या सरकारला अनेक अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. शिवसेनेत सुरु असलेली उलथापालथ महाराष्ट्रातील काँगेसवरही परिणाम करु शकते. सोमवारी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे सर्व पाच आमदार निवडून आल्याने महाविकास आघाडीला धक्का बसला होता. त्यापाठोपाठ शिवसेनेत उभी फूट पडल्याचा आरोप होत आहे. विधानपरिषद निवडणुकीत काँगेस पक्षाचेही तीन आमदार फुटल्याचा आरोप होत आहे. आता आणखी आमदार फुटू नयेत म्हणून काँगेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कृती करण्यास प्रारंभ केला आहे. महाराष्ट्रातील काँगेस आमदार एकत्र ठेवण्याची जबाबदारी कमलनाथ यांच्यावर सोपविण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कमलनाथांना विरोध

कमलनाथ यांना काँगेसमधीलच काहीजण विरोध करत असल्याचे वृत्त आहे. मध्यप्रदेशात काँगेसमध्ये फूट पडून सरकार गेले तेव्हा कमलनाथच मुख्यमंत्री होते. त्यांना आपले आमदार वाचविता आले नव्हते. त्याच कमलनाथांची आता महाराष्ट्रातील काँगेस वाचविण्यासाठी नियुक्ती केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

Related Stories

पाच राज्यातील निवडणूक लांबणार?

Patil_p

‘पेरियार’संबंधी टिप्पणी, तामिळनाडूमध्ये वादंग

Patil_p

तेलंगणा : बलात्कार करणाऱ्या आरोपीचा मृतदेह आढळला रेल्वे रुळावर

Abhijeet Shinde

प. बंगाल : भाजपच्या ‘या’ नेत्यावरही 48 तासांची प्रचारबंदी

datta jadhav

अर्थव्यवस्था गतिमान होण्याचा शुभसंकेत

Patil_p

समिती स्थापण्याची शेतकऱयांची तयारी

Patil_p
error: Content is protected !!