Tarun Bharat

अभिनेता कमाल खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; बोरिवली कोर्टाचा आदेश

Advertisements

Kamal Rashid Khan : वादग्रस्त ट्विटप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता कमाल खान अर्थात केआरके याला बोरिवली कोर्टानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्याला मालाड पोलिसांनी अटक केली होती. आज बोरिवली कोर्टात हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

काही दिवसांपासून केआरकेला अटक होणार अशी चर्चा सुरु होती. तो जेव्हा मुंबई विमानतळावर आला तेव्हा त्याला अटक करण्यात आली. केआरके हा सोशल मीडियावर आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असतो. केआरके हा भारतीय अभिनेता, कथा लेखक, निर्माता आहे. त्यानं सन २००९ मध्ये बिगबॉस या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग नोंदवला होता. तेव्हापासून तो प्रकाशझोतात आला. देशद्रोही नावाच्या सिनेमामुळं तो बॉलिवूडमध्ये चर्चेत आला होता. हा सिनेमाची त्यानं निर्मिती देखील केली होती.

Related Stories

मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनची कबर सजवली

Abhijeet Shinde

VIDEO-कोल्हापूर:दूधगंगा उजव्या कालव्याला भगदाड

Rahul Gadkar

‘सिटाडेल’साठी समांथाने कसली कंबर

Patil_p

राधानगरीच्या जंगलात वाघाचे दर्शन

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात पुन्हा विक्रमी वाढ! बुधवारी 67,468 नवे कोरोना रुग्ण; 568 मृत्यू

Rohan_P

पालघर हत्याकांड : पीडितांची बाजू मांडणाऱ्या वकिलाचा अपघातात मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!