मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कामत गल्ली परिसरात कोसळण्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. सुधीर बडमंजी व अनिल बडमंजी यांच्या मालकीचे घर कोसळले असून यामध्ये घराचे मोठे नुकसान झाले आहे. घर कोसळल्यामुळे बडमंजी कुटुंबाचा राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये अंदाजे एक ते दीड लाख रुपयांचा नुकसान झाल्याची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.


previous post