प्रतिनिधी /पणजी
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी सभापती रमेश तवडकर यांच्या समोर दिगंबर कामत व मायकल लोबो यांच्या विरोधात सादर केलेली अपात्रता याचिका सभापतींनी दाखल करुन घेतली आहे.
पाटकर यांनी आपल्या वकिलांबरोबरच सभापती तवडकर यांची भेट घेतली आणि चर्चा केली. याचिकेवर सुनावणी करावी तसेच त्यांच्या विरोधात याचिका सादर केलेली आहे, त्यांना त्वरित नोटीसा बजावा व सुनावणी घ्यावी अशी मागणी केली. सभापती तवडकर यांनी आपण सदर याचिका दाखल करुन घेतलेली आहे. विधानसभेचे अधिवेशन चालू आहे. कामाचा व्याप आहे तेव्हा अधिवेशनानंतर याचिकेवर विचार करीन, असे पाटकर यांना कळविले.