

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
फिनिक्स स्पोर्ट्स कौन्सिल आयोजित दहाव्या फिनिक्स चषक 13 वर्षाखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात कनक मेमोरियल संघाने सेंट पॉल्स संघाचा टायब्रेकरमध्ये 6-5 अशा गोलफरकाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
कनक मेमोरियल स्कूलच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात कनक मेमोरियल संघाने सेंट पॉल्स संघाचा टायब्रेकरमध्ये पराभव केला. या सामन्यात पहिल्या मिनिटापासूनच दोन्ही संघानी गोल करण्यासाठी आक्रमक चढाया सुरू केल्या. 22 व्या मिनिटाला कनक मेमोरियलच्या आराध्य नाकाडीने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 23 व्या मिनिटाला कनक मेमोरियलने आक्रमक चढाई करत झेन पटेलने बरोबरीचा गोल नोंदवला. पहिल्या सत्रात दोन्ही संघाचा गोलफलक बरोबरीत राहिला. दुसऱया सत्रात 39 व्या मिनिटाला सेंट पॉल्सच्या योगेश नंदीने वेगवान फटका कनक मेमोरियलच्या गोलमुखात मारला होता. पण तितक्मयाच चलाखीने कनकच्या गोलरक्षकाने तो अडविला.
निर्धारित वेळेत गोलफलक बरोबरीत राहिल्याने पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये कनक मेमोरियल संघाने 6-5 अशा गोलफरकाने विजय संपादन केला. कनक मेमोरियलतर्फे गणेश भरूर, शिवराज मठद, पवन परमार, झेन पटेल, हुसेन बसरीकट्टी यांनी गोल केले. सेंट पॉल्सतर्फे श्रेयस तरळे आराध्य नाकाडी, योगेश नंदी, सुईत गानगेकर यांनी गोल केले तर कॅनकी गोदतग्प्प् याने चेंडू गोलपोस्टच्या बारला लागल्याने सेंट पॉल्स संघाला पराभव पत्करावा लागला.