फिनिक्स चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
फिनिक्स स्पोर्ट्स कौन्सिल आयोजित फिनिक्स चषक 13 वर्षाखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या मंगळवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व सामन्यातून सेंट झेवियर्सने भरतेश सेंट्रलचा, कनक मेमोरियलने गुडशेफर्डचा, इस्लामियाने जीजी चिटणीसचा तर सेंट पॉल्सने एमव्हीएमचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
कनक मेमोरियल मैदानावर खेळविण्यात आलेल्या फिनिक्स चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात सेंट झेवियर्स संघाने भरतेश सेंट्रल संघाचा 7-0 असा पराभव केला. रोशन अब्बासने 2, झियान मुल्ला, झेन मुल्ला, माहिद भडकली, सादीय ताशिलदार, उझेर रोटीवाले यांनी गोल केले. दुसऱया सामन्यात कनक मेमोरियल संघाने गुडशेफर्ड संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. गणेश भाऊरने एकमेव विजयी गोल केला. तिसऱया सामन्यात इस्लामिया संघाने जीजी चिटणीस संघाचा 2-1 असा निसटता पराभव केला. इस्लामियाच्या रायन पटवेकरने 2, चिटणीसचा गोल पेनल्टीवर दर्शन मातंगीने नोंदवला. चौथ्या सामन्यात सेंट पॉल्सने एमव्हीएमचा 4-0 असा पराभव केला. अब्दुल मतीनने 2, आराध्य नागाडी, श्रेयस यांनी एकेक गोल केले.
बुधवारचे उपांत्य सामने
- कनक मेमोरियल वि. सेंट पॉल्स सकाळी 10 वाजता.
- इस्लामिया वि. सेंट झेवियर्स सकाळी 11 वाजता.