वृत्तसंस्था/ पुणे
बालेवाडीच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या 9 व्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या दुसऱया टप्प्यातील रविवारी झालेल्या सामन्यात विकास कंडोलाच्या शानदार कामगिरीच्या जोरावर बेंगळूर बुल्सने जयपूर पिंक पँथर्सचा 37-31 अशा सहा गुणांच्या फरकाने पराभव केला.
हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. विकास कंडोलाने शानदार सुपर रेड केल्याने बेंगळूर बुल्सला विजय नोंदविता आला. सामना संपण्यास केवळ काही मिनिटे बाकी असताना दोन्ही संघ 30-30 असे बरोबरीत होते. बेंगळूर बुल्स संघातील विकास कंडोलाने जयपूर पिंक पँथर्सचे गडी मोठय़ा प्रमाणात बाद करत आपल्या संघाला 16-6 अशी आघाडी मिळवून दिली. 17 व्या मिनिटाला जयपूर संघातील भवानी रजपूतने सुपर रेड नोंदविली. त्यामुळे दोन्ही संघातील गुणांचा फरक कमी झाला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांची स्थिती 19-19 अशी बरोबरीत होती.