Tarun Bharat

कंगना रनौतला मिळाला बायोपिक

 विनोदिनींची भूमिका साकारणार

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत स्वतःच्या रोखठोक शैलीसाठी ओळखली जाते. कंगना आता एका चित्रपटात प्रतिष्ठित सुपरस्टारच्या भूमिकेत दिसून येणार असल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच बंगालच्या सर्वात प्रतिष्ठित रंगमंच सुपरस्टारांपैकी एक विनोदिनी यांच्या बायोपिकमध्ये काम करणार असल्याचे कंगनाने सांगितले आहे.

प्रदीप सरकार यांची मी मोठी चाहती राहिली असून त्यांच्यासोबत काम करण्याची ही संधी मिळाल्याने अत्यंत आनंदी आहे. प्रकाश कपाडिया यांच्यासोबतचा हा माझा पहिला प्रोजेक्ट असून देशातील काही महान कलाकारांसोबत या प्रवासाचा हिस्सा झाल्याने अत्यंत उत्साही असल्याचे कंगनाने म्हटले आहे. या मेगाबजेट चित्रपटाची कहाणी प्रकाश कपाडिया यांनी लिहिली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन प्रदीप सरकार करणार आहेत.

नटी विनोदिनी यांनी वयाच्या 12 व्या वर्षापासून रंगभूमीवर अभिनय करण्यास सुरुवात केली होती. त्यांना बंगाली रंगभूमीच्या महान कलाकारांपैकी एक मानले जाते. त्यांनी स्वतःच्या 11 वर्षांच्या कारकीर्दीत प्रमिला, सीता, द्रौपदी, राधा, आयशा, कैकेयी, मोती भाभी आणि कपालकुंडला सह अनेक भूमिका साकारल्या होत्या.

कंगना सध्या स्वतःचा आगामी चित्रपट ‘इमरजेंसी’च्या चित्रिकरणात व्यस्त आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केल्यावर पुढील वर्षी ती विनोदिनी यांच्या बायोपिकवर काम सुरू करणार आहे.  इमरजेंन्सी चित्रपटात कंगना रनौत ही माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. कंगना रनौत ही सर्वेश मारवा यांच्या दिग्दर्शनात तयार ‘तेजस’ या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात ती एका लढाऊ वैमानिकाची भूमिका साकारत आहे.

Related Stories

कलेतून संदेश देणारे कलाकार आंदोलनाच्या पवित्र्यात

Archana Banage

महेश टिळेकर यांनी पाकिस्तान बॉर्डरवर जाऊन केले हे काम

Patil_p

रणबीरनंतर आता आलिया भट्टही कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

‘द इटर्नल्स’ 12 जानेवारीला झळकणार

Amit Kulkarni

आमिर आणि आझादने घेतला आंब्याचा आस्वाद

Archana Banage

‘दिल है ग्रे’चे पोस्टर उर्वशीकडून प्रसारित

Patil_p
error: Content is protected !!