Tarun Bharat

अभिनेत्री कंगना रणौत CM शिंदेंना भेटणार; चर्चेला उधाण

Advertisements

Maharashtra Politics : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सातत्याने चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रणौत उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कंगना रणौत ही भाजपाच्या समर्थनार्थ सातत्याने बोलत असते. २०२४ साली ती मथुरेतून निवडणूक लढवणार असल्याच्याही चर्चा आहेत. खासदार हेमा मालिनी यांनी याचविषयी एक विधानही केलं होतं. उद्या राखी सावंत जरी उभी राहिली तरी मथुरेतली जनता तिलाही निवडून देतील, असा टोला त्यांनी कंगना रणौतला लगावला आहे. २०२४ ला लोकसभेच्या निवडणुकीला कंगना उभं राहणार असल्याच्या चर्चांमध्ये होणाऱ्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.


एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर कंगनाने त्यांना शुभेच्छाही दिल्या होत्या. त्यावेळी तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एकनाथ शिंदे यांचा एक फोटो शेअर केला होता. त्यासोबत तिने लिहिलं होतं की, यशस्वी होण्याची ही एक प्रेरणादायी कथा आहे. रिक्षा चालवण्यापासून देशातल्या सगळ्यात महत्त्वाची आणि शक्तिशाली व्यक्त बनण्यापर्यंतचा प्रवास…तुम्हाला शुभेच्छा सर.

Related Stories

हेलिकॉप्टर अपघात : सरलष्कर प्रमुख बिपिन रावत यांची प्रकृती गंभीर

Abhijeet Khandekar

तोडफोडीनंतर तानाजी सावंतांचा शिवसेनेला इशारा;म्हणाले,औकातीत रहा…

Abhijeet Khandekar

पुष्प पठाराबरोबरच कास पठारावर पर्यटकांसाठी बससेवा

Archana Banage

परवानाधारक 27 हजार 539 रिक्षा चालकांच्या खात्यांमध्ये अनुदान जमा

Tousif Mujawar

उस्मानाबाद : चिखलीतील पोलीस कॉन्स्टेबल कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

“तुम्ही माझं रेटिंग बदललं, मन नाही” : दीपिका पादुकोण

Archana Banage
error: Content is protected !!