Tarun Bharat

कंगना राणावतचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; सोशल मिडीयावर चर्चा

ऑनलाईन टिम : मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी वर्षा हे त्यांचे शासकीय निवासस्थान सोडून ‘मातोश्री’वर परतले. महाराष्ट्रातील तसेच शिवसेनेवरील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा एक जुना व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कंगना राणावत, “उद्धव ठाकरे, तुम्हाला काय वाटतं? चित्रपट माफियांशी हातमिळवणी करून तुम्ही माझे घर पाडले आहे? आज तुम्ही माझे घर पाडले आहे. उद्या तुमची घमेंड गळून पडेल” असे म्हणताना दिसत आहे.

ट्विटर वापरणऱ्या अनेक नेटिझन्सनी कंगना राणौतचा हा जुना व्हिडिओ शेअर केला. 2020 मध्ये जेव्हा कंगनाचे घर बृहन्मुंबई महानगरपालिकेने पाडले तेव्हा कंगणा राणावतने उद्धव ठाकरेंसाठी हे उद्गार काढले होते.
कंगना राणावतचा आणखी एक जुना व्हिडिओ फिरत असून त्यामध्ये ती म्हाणते की, “इतिहास साक्षी आहे, जो कोणी एखाद्या स्त्रीचा अपमान करतो त्याचे पतन होते. रावणाने सीतेचा अपमान केला, कौरवांनी द्रौपदीचा अपमान केला, मी देखील एक स्त्री आहे. माझा असा विश्वास आहे की, जेव्हा एखाद्या स्त्रीचा होईल तेव्हा सर्वनाश निश्चित आहे.”

Advertisements

Related Stories

भारतात समूह संसर्गाचा धोका नाही

Patil_p

अखिल भारतीय किसान सभा संघटनेचा भारत बंदला पाठिंबा

Patil_p

परिवहन मंत्र्यांना ईडीचा आदेश; पण परब साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला

Abhijeet Khandekar

कर्नाटक केएसईटी २०२१ परीक्षेची तारीख जाहीर

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात 2,585 नवीन कोरोनाबाधित; 40 मृत्यू

Rohan_P

400 पाक दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

Patil_p
error: Content is protected !!