Tarun Bharat

कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. अध्यक्ष-उपाध्यक्षांवर अविश्वास ठरावासाठी 2 जूनला मतदान

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक

कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्षांवर ग्रा. पं. सदस्यांकडून अविश्वास ठराव दाखल करण्यात आला असून 2 जून रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असल्याची माहिती ग्राम पंचायत कार्यालयातून मिळाली आहे.

ग्रा. पं. अध्यक्षा संध्या चुगले व उपाध्यक्ष अनिल पावशे या दोन्ही पदांसाठी हा अविश्वासाचा ठराव आणल्याची माहिती मिळाली आहे. कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. ही तालुक्यातील मोठी पंचायत म्हणून पाहिले जाते. या पंचायतीमध्ये एकूण 13 वॉर्डांसाठी 34 सदस्य संख्या आहे.

मागील वर्षी डिसेंबर 2020 मध्ये सदर ग्राम पंचायतची निवडणूक झाली. त्यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये ग्रा. पं. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत संध्या चौगुले व पूनम पाटील या दोघींना 17-17 अशी समान मते पडली होती. त्यामुळे चिठ्ठी काढून हे अध्यक्षपद ठरविण्यात आले होते. त्यामध्ये संध्या चौगुले यांची चिठ्ठी आल्याने त्यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनिल पावशे यांनी 22 मते मिळवून 12 मतांनी विजय मिळविला होता.

परंतु आता असमाधानकारक काम, अनियमित बैठका तसेच अन्य कारणांमुळे जवळजवळ 31 सदस्यांनी सध्या केलेले निवेदन अविश्वास ठरावासाठी दिले होते. त्याची दखल घेऊन शासकीय अधिकाऱयांनी मंगळवारी सर्व सदस्यांनी लेखी पत्रक देऊन 2 जून रोजी अविश्वास ठरावावर प्रत्यक्ष मतदान होणार असल्याचे कळविले आहे. अविश्वास संमत होण्यासाठी 26 सदस्यांनी अविश्वासाच्या बाजूने मतदान केल्यास अविश्वास ठराव मंजूर होणार आहे.या सर्व घडामोडींमुळे गावातील राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले असून गावात राजकीय चर्चांना चांगलीच धार आली असल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

रस्ते विकासाला प्राधान्य देणार

Amit Kulkarni

घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला बाजारात गर्दी

Amit Kulkarni

हुबळी विभागीय रेल्वेला मालवाहतुकीतून मोठे उत्पन्न

Amit Kulkarni

बाळासाहेबांनी देशाला हिंदुत्व पटवून दिले

Patil_p

कर्नाटक-महाराष्ट्र ‘हिंदकेसरी’ ‘नाग्या’चा मृत्यू

Rohit Salunke

विमुक्त भटक्या समाज कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

Patil_p