Tarun Bharat

कंग्राळी बुद्रुक मराठी शाळा एसडीएमसी निवड

अध्यक्षपदी शंकर कोणेरी, उपाध्यक्षपदी वनिता अष्टेकर

कंग्राळी बुद्रुक : येथील मराठी शाळा सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी शंकर परशराम कोणेरी तर उपाध्यक्षपदी वनिता चंद्रकांत अष्टेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. मराठी शाळेच्या सभागृहामध्ये बोलाविलेल्या निवड कमिटीच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्षा पूनम पाटील होत्या.

यावेळी ग्रा. पं. उपाध्यक्ष यल्लोजी पाटील, ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, दादासाहेब भद्दरगडे, उमेश पाटील, तानाजी पाटील, नवनाथ पुजारी, अर्चना पठाणे, रेखा इंडिकर, भारता पाटील, मेनका कोरडे आदी उपस्थित होते.

मुख्याध्यापक उमेश चौगुले यांनी उपस्थितांचे स्वागत करुन कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. यावेळी निवडणूक बिनविरोध केल्यामुळे सर्व सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले.

बिनविरोध सदस्य

गोपाळ गणपत पाटील, व्यंकट शिवाजी पाटील, बसवंत मारुती पाटील, युवराज मनोहर हुद्दार, सुभाष कल्लाप्पा पाटील, शंकर चंद्रकांत पाटील, सुधीर लक्ष्मण भेकणे, शिवानंद अमृत कोळी, लक्ष्मी मारुती नार्वेकर, नूतन जोतिबा पवार, जयश्री किरण शटवाजी, दिपा उमेश पाटील, राजश्री राजू लोहार, मनिषा विनोद परिट, कल्पना निंगापा निलजकर, मेघा संजय नाईक आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी पदनिमित कमिटीपदी मुख्याध्यापक यु. पी. चौगुले, अंगणवाडी कार्यकर्त्या निता मारुती पाटील, आरोग्य कार्यकर्त्या वर्षा घोडके यांची निवड करण्यात आली. ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, ग्रा. पं. सदस्य अनिल पावशे, ज्येष्ठ शिक्षक प्रशांत आण्णासाहेब पाटील यांची नामनिर्देश कमिटीमध्ये निवड करण्यात आली. ग्रा. पं. अध्यक्षा पूनम पाटील उपाध्यक्ष यल्लोजी पाटील यांची सीएसी कमिटीमध्यs निवड करण्यात आली.

Related Stories

खानापूर तालुक्यातील वीट उत्पादकांना पावसाचा फटका

Omkar B

महिला आघाडीने घेतल्या महिला मंडळांच्या गाठीभेटी

Amit Kulkarni

गोल्डन व्हाईस ऑफ बेलगाम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी 26 पासून

Amit Kulkarni

आज दुपारपासून दारूविक्री बंदीचा आदेश

Patil_p

पॅरा टेबलटेनिस स्पर्धेसाठी संजीव हम्मण्णावर फ्रान्सला रवाना

Amit Kulkarni

वैभवनगर येथे भर दिवसा घरफोडी

Amit Kulkarni