ग्रा. पं. पदाधिकाऱयांचे जि. पं. अधिकाऱयांना निवेदन
वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायतीला कायमस्वरुपी पीडीओची नेमणूक करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशा मागणीचे निवेदन कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. अध्यक्षा पूनम पाटील, उपाध्यक्ष यल्लोजी पाटील व सदस्यांच्यावतीने जि. पं. चिफ सेक्रेटरींना बुधवारी देण्यात आले.
कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायतीचा विस्तार मोठा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या पंचायतीमध्ये पीडीओ म्हणून काम करणारे अधिकारी दोन पंचायतींचा कारभार पाहत आहेत. सध्याचे पीडीओ कंग्राळी बुद्रुक व कंग्राळी खुर्द या दोन्ही पंचायतींचे काम पाहत असल्यामुळे ग्रा.पं.मधील विकासकामांना खीळ बसत असून नागरिकांची दैनंदिन कामे वेळेत होण्यास विलंब होत आहे.
कंग्राळी गावची लोकसंख्या 25 हजारच्या घरात आहे. कंग्राळी बुद्रुक व गौंडवाड अशा 13 वॉर्डांची ही ग्रामपंचायत असून सदस्यसंख्या 34 आहे. अशा मोठय़ा विस्ताराच्या ग्रामपंचायतीला कायमस्वरुपी पीडीओची नेमणूक करणे गरजेचे आहे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी ग्रा. पं. अध्यक्षा पूनम पाटील, उपाध्यक्ष यल्लोजी पाटील, सदस्य दत्ता पाटील, जयराम पाटील, सद्याप्पा राजकट्टी, सुरेश राठोड, नवनाथ पुजारी, बाबू दोडमनी, दादासाहेब भदरगडे, तानाजी पाटील, मल्लेशी बुड्री, मेनका कोरडे, भारता पाटील, सुचिता कोळी, शकुंतला सिंग, कल्पना पवार, अर्चना पठाणे, लक्कव्वा बेळगावी, रेखा सुतार, वंदना चव्हाण, फकिरव्वा बेळगावी, सुप्रिया कोळी आदी उपस्थित होते.