Tarun Bharat

कन्नड अभिनेता स्वंयअपघातात गंभीर

गोव्यात सुट्टी घालवताना ओढवला प्रसंग

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

कुटुंबियांसमवेत सुट्टी घालविण्यासाठी गोव्यात आलेल्या दिगंत या कन्नड अभिनेत्यावर एका स्वयंअपघातात गंभीर दुखापतीमुळे इस्पितळात जावे लागण्याचा प्रसंग आला.

त्याच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली असून वैद्यकीय उपचारासाठी हवाईमार्गे गोव्यातून बेंगळुरूला नेण्यात आले आहे. दुखापतीबद्दल अभिनेत्याच्या टीमकडून किंवा रुग्णालयाच्या अधिकाऱयांकडून कोणताही अधिकृत तपशील प्राप्त झालेला नसला तरीही अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे इस्पितळातील सुत्रांनी सांगितले आहे.

प्राप्त माहितीनुसार दिगंत आपल्या नियमित व्यायामादरम्यान ट्रम्पोलिनवर बॅकफ्लिप करत असताना अचानक पाठीवर कोसळला. त्यात त्याचे डोके जमिनीला आपटले. तसेच पाठीच्या कण्यालाही दुखापत झाली. त्याची बोटे सुन्न होऊ लागली. या दुखीमुळे विव्हळत असताना त्याला प्रथम स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मानेला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला गोव्यातून विमानाने बेंगळुरू येथे आणण्यात आले. तेथील मणिपाल रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

दरम्यान, दिगंतच्या अपघाताची बातमी समजताच त्यांच्या चाहत्यांनी ट्विटरवरून  संदेश पाठवत अभिनेत्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केल्या.  सोबत रहा. प्रार्थना,” एका ट्विटमध्ये लिहिले आहे. “दिगंत, लवकर बरे व्हा,” दुसऱया एका चाहत्याने लिहिले.

दिगंतला 2017 मध्ये त्याच्या ‘टिकेट टू बॉलीवूड’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान उजव्या डोळय़ाला कॉर्नियाला इजा झाली होती. दिगंतने 2006 मध्ये चित्रपटश्रृष्टीत पदार्पण केल्यापासून आजपर्यंत 35 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले. ’पंचरंगी’, ’गालीपाता’ यासारख्या चित्रपटांमुळे त्याच्या अभिनयाला सर्वत्र पसंती मिळाली व प्रसिद्धीच्या झोतात आला. ’मुंगारू माले’ या चित्रपटातही त्याने छोटीशी भूमिका साकारली होती.

Related Stories

फोंडय़ात उद्या ऐतिहासिक नाटक ‘शंभूराजे’

Amit Kulkarni

एसीजीएल विरोधात वाळपईत भव्य मोर्चा

Amit Kulkarni

राजेंद्र आर्लेकर यांचा लोकमान्य सोसायटीतर्फे सत्कार सोहळा संपन्न

Omkar B

केंद्राने स्थानिक पातळीवर उत्पादित होणाऱ्या ऑक्सिजनच्या वापरास परवानगी द्यावी : आरोग्यमंत्री

Abhijeet Shinde

बेंगळूरमध्ये मुंबईपेक्षा दुप्पट सक्रिय रुग्ण

Abhijeet Shinde

लॉकडाऊन वाढीची घोषणा आज?

Patil_p
error: Content is protected !!