भाजप उमेदवार डॉ. रवी पाटील यांच्या प्रचारासाठी बेळगावात दाखल : मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव : भारतीय जनता पार्टीचे बेळगाव उत्तरचे अधिकृत उमेदवार डॉ. रवी पाटील यांच्या प्रचाराकरिता बेळगावला आले होते. यावेळी श्रीनगर येथून रोड शोला प्रारंभ झाला. उत्साहपूर्ण वातावरणात निवडणूक प्रचाराच्या रोड शोला सुरुवात झाली. यावेळी अभिनेते किच्चा सुदीप यांनी चाहत्यांशी संवाद साधला आणि भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी खासदार इराण्णा कडाडी, खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके यांसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे बेळगाव उत्तरचे अधिकृत उमेदवार डॉ. रवी पाटील यांनी कामगारांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केली.
रु क्मिणीनगर
बेळगाव शहरातील रुक्मिणीनगर येथील झोपडपट्टीवासियांची भेट घेऊन डॉ. रवी पाटील यांनी त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त कामगारांची भेट घेऊन त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. कामगार आणि शेतकरी हा देशाचा कणा आहे. कामगारांच्या जीवनात बदल घडवून आणणे हे माझे ध्येय आहे, असे डॉ. रवी पाटील यावेळी बोलताना म्हणाले. उत्तर भागातील कामगार आणि रहिवाशांच्या तक्रारींची दखल घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी प्रचारादरम्यान दिली. यावेळी रुक्मिणीनगरातील रहिवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
डॉ. बी. आर. आंबेडकर कॉलनी
शहरातील डॉ. बी. आर. आंबेडकर कॉलनी येथील नागरिकांची भेट घेऊन तेथील रहिवाशांचा पाठिंबा डॉ. रवी पाटील यांनी घेतला. यावेळी बेळगाव महानगरपालिका प्रभाग क्रमांक 46 चे नगरसेवक हनुमंत कोंगाळी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. रवी पाटील यांनी प्रचार केला. तसेच मुरगेंद्रगौडा पाटील यांच्यासह प्रभाग 35 चे नगरसेवक महादेव राठोड आणि कार्यकर्त्यांसह घरोघरी जाऊन मतयाचना केली. नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी व स्वच्छतेसाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर डॉ. रवी पाटील यांनी राणी चन्नम्मा हाऊसिंग सोसायटी, श्रीनगर येथे प्रचार केला. तेथील नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून येत्या निवडणुकीत भाजपलाच मतदान करण्याचे आश्वासन दिले. तसेच वंटमुरी कॉलनीत मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दुपारी फुलबाग गल्ली येथे कार्यकर्ते व नागरिकांची बैठक डॉ. रवी पाटील यांनी घेतली. यावेळी मतदारांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि आवश्यक मूलभूत सुविधांची माहिती दिली. आगामी काळात चांगल्या सुविधा देणार असल्याचे सांगून निवडणुकीत भाजपला साथ देण्याची विनंती डॉ. रवी पाटील यांनी केली.
आजचा प्रचार मार्ग…
कॅम्प परिसरातील मारुती मंदिर, स्वामी बेकरीजवळ त्यानंतर संध्याकाळी कपिलेश्वर मंदिर तांगडी गल्ली, रामा मिस्त्राr अ•ा, संभाजी गल्ली, तानाजी गल्ली, मल्लिकार्जुननगर, समर्थनगर, भांदूर गल्ली, पाटील मळा, ताशिलदार गल्ली, दो•ण्णावर कॉम्प्लेक्स, फुलबाग गल्ली पहिला, दुसरा आणि तिसरा क्रॉस तसेच पाटील गल्ली आणि शनिमंदिर येथे प्रचार रॅलीची सांगता होणार आहे. तर दुपारी ऑटोमोबाईल आणि सीए असोसिएशनची बैठक पार पडणार आहे.