करंझोळ : अमाप उत्साह, प्रत्येकाच्या अंगामध्ये असलेली पारंपरिक कला व शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत सत्तरी तालुक्यातील करंझोळ येथील श्री सातेरी ब्राह्मणी देवस्थानचा पारंपरिक चोरोत्सव रविवारी रात्री साजरा करण्यात आला. यावेळी गोव्याच्या वेगवेगळ्dया भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक हा पारंपरिक चोरोत्सव पाहण्यासाठी उपस्थित होते. रात्री 10 वा.पर्यंत हा उत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर पारंपरिक घोडेमोडणी उत्सव साजरा करण्यात आला. गोव्यातील पारंपरिक कलेचा जोशपूर्ण असा हा उत्सव करंझोळ गावांमध्ये शेकडो वर्षापासून साजरा करण्यात येत आहे. संध्याकाळी 6 वा.च्या दरम्यान गावातील मांडावर सार्वजनिक सांगणे करण्यात आले. चोरोत्सव अमाप उत्साहाने साजरा करण्याची शक्ती देवीने सर्वांना द्यावी असे साकडे घालत सत्तरी तालुक्यातील प्रत्येक गावातून आलेल्या गावुणग्याना मान देत याला प्रारंभ करण्यात आला. करंझोळ गावातील या चोर उत्सवात गाघे गावुणगे याना एक विशिष्ट असा मान असतो. सार्वजनिक सांगणे झाल्यानंतर जोशपूर्ण अवस्थेत ही सर्व मंडळी श्री सातेरी ब्राह्मणी देवस्थानच्या प्रांगणात जातात व त्या ठिकाणी उत्सव साजरा करण्यात येत असतो. देवस्थानच्या मंदिरात सर्व गावुणग्य्याना विशेष सन्मान दिला जातो. यावेळी तीर्थ देणे, कुंकुमतिलक लावणे व व इतर धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. तद्नंतर पारंपरिक उत्सवाला प्रारंभ करण्यात आला. चोरेत्सवव व्रत पाळणारे आठ गडे यामध्ये सहभागी झाले होते. पैकी चार गडे डोक्याने तर चार कमरेने जमिनीत पुरण्यात आले होते. तर एक सुवारी, दुसरा मु•dयाचा चोर असे चित्र दाखविण्यात आले होते.
सदर पारंपरिकता पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल असा नारा देत हा चोर उत्सव साजरा करण्यात येत होता. पारंपारिक वादन व वेगळी प्रथा यामुळे या चोर उत्सवात वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. तद्नंतर पारंपरिक घोडेमोडणी साजरी करण्यात आली. हा उत्सव रात्री उशिरापर्यंत सुरू होता. यात करंझोळ सातेरी ब्राह्मणी देवीचे दोन तर कुमठोळ येथील देवीचा 1 घोडा घोडेमोडणीत रात्री उशिरापर्यंत गावच्या मांड्यावर साजरी करण्यात आली होती. या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना गावचे ज्येष्ठ नागरिक हरिश्चंद्र गावस यांनी सांगितले की, शेकडो वर्षांपासूनची ही परंपरा आजही त्याच उत्साहाने साजरी करण्यात येत आहे. हा उत्सव म्हणजे साठा सत्तरीचा उत्सव असून प्रत्येक गावुणगे याना सन्मानित करण्यात येत असते. जेष्ठ नागरिक अर्जुन केरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गावांमध्ये दरवर्षी साजरा करण्यात येणारा उत्सव हा या गावची प्रतिष्ठा जपणारा असून गोमंतकामधील पारंपरिक स्तरावर वेगळी अशी शैली निर्माण करणारा आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहणारा हा गाव स्वाभिमानी जनतेमुळे वेगळी अशी ओळख निर्माण करणारा आहे असे ते म्हणाले.