ऑनलाईन टीम / तरुण भारत :
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. ते आता समाजवादी पक्षात प्रवेश करणार असून, त्यांना सपाकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
सिब्बल यांनी 16 मे रोजीच आपला राजीनामा काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सोपवला असल्याचे समजते. सिब्बल काँग्रेसमधून बाहेर पडल्याने जी-23 गटातून एक नेता पक्षाबाहेर पडला आहे. ते पक्षाच्या ध्येयधोरणांवर नाराज होते. अनेकदा त्यांनी आपली नाराजीही उघडपणे बोलून दाखवली होती. सिब्बल आता अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाची मदत घेऊन राज्यसभेवर जाणार आहेत. त्यांनी आज लखनऊमध्ये जाऊन राज्यसभा निवडणुकीसाठीचा अर्जही भरला.
सिब्बल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अखिलेश यादव म्हणाले की, सपाच्या पाठिंब्याने सिब्बल राज्यसभेवर जाणार आहेत. याशिवाय आणखी दोन लोक राज्यसभेवर जाऊ शकतात. आम्हाला आशा आहे की, आगामी काळात ते समाजवादी पक्षाची आणि स्वत:ची मते चांगल्याप्रकारे सभागृहात मांडतील.
सिब्बल हे राजकारणासोबत एक कायदेतज्ञदेखील आहेत. अनेक महत्त्वाचे खटले त्यांनी स्प्रीम कोर्टात लढवले आहेत. सिब्बल यांना समाजवादी पक्षासह राष्ट्रीय जनता दल आणि झारखंड मुक्ती मोर्चा आदी पक्षांकडून ऑफर असल्याची चचा &यापूर्वी सुरू होती. या तिन्ही पक्षांच्या महत्त्वांच्या नेत्यांचे खटले सिबल यांच्याकडे आहेत.