Tarun Bharat

कराड पोलिसांची दरोडेखोरांशी झटापट; एकाला पकडले

कराड / वार्ताहर :

कराड-विटा मार्गावरील गजानन हौसिंग सोसायटीत सोमवारी पहाटे बँक ऑफ इंडियाचे एटीएम जिलेटिनच्या सहाय्याने उडवून देण्याचा प्रयत्न झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, कराड पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला. धाडसी पोलिसांची चोरट्यांशी थरारक झटापट करत त्यांना पकडले. यावेळी झालेल्या झटापटीत चोरट्यांनी त्यांच्याकडील स्प्रे पोलिसांच्या डोळ्यात मारल्याने तीन पोलीस जखमी झाले. याचा फायदा घेत तीन चोरटे पसार झाले. मात्र, एकाला पकडून ठेवण्यात जखमी पोलिसांना यश आले. या थरारक घटनेमुळे खळबळ उडाली असून, डोळ्यात स्प्रे मारल्याने जखमी झालेले पोलीस खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत.

संशयित सचिन अशोकराव वाघमोडे (वय 38, रा. आदर्श नगर, काळेवाडी, पुणे) असे पोलिसांनी पकडलेल्या संशयित दरोडेखोराचे नाव आहे. याच ठिकाणी एक होंडा ट्विस्टर मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. गजानन हौसिंग सोसायटीत काही लोक एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती वायरलेसद्वारे कराड पोलिसांना मिळाली. वायरेलस कक्षातील महिला पोलिसाने प्रसंगावधान राखत हा प्रकार पेट्रोलिंग करत असलेल्या दामिनी पथकासह बीट मार्शल पथकास कळवला. पोलीस हवालदार जयसिंग राजगे, हवालदार पाटील, हवालदार सुर्यवंशी, गृहरक्षक दलाचे निकम हे वेगाने गजानन हौसिंग सोसायत पोहचले. त्यांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न करताच चोरट्यांनी पोलिसांशी झटापट सुरू केली. पोलिसांनी धाडसाने चौघांना पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला यातील एका शातिर चोरट्याने त्याच्या हातातील स्प्रे पोलिसांच्या डोळ्यात मारला. त्यामुळे पोलीस जखमी झाले. तरीही पोलिसांनी चोरट्यांना पकडून ठेवले. मात्र पोलिसांच्या जखमी होण्याचा फायदा घेत तीन चोरटे पसार झाले.

एटीएम सेंटरच्या बाहेर एक संशयास्पद वायर अंथरली असून, जिलेटीनच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न तर नव्हता ना? याचा शोध घेण्यात येत आहे.

हेही वाचा : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार

Related Stories

चीन पूर्व लडाखमधून सैन्य मागे घेणार

datta jadhav

पीक कर्जाच्या वसुलीस ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

Archana Banage

वेश्या व्यवसाय कायदेशीर; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

Archana Banage

जिल्ह्यातील २०० खेळाडू घेतायेत तायक्वांदोचे ऑनलाईन धडे

Archana Banage

तालिबानची भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी केली तुलना, सपाच्या खासदारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

Archana Banage

शिवराज राक्षे ठरला 65 व्या ‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी

Archana Banage