Tarun Bharat

तळागाळातील जनतेपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविणे गरजेचे : तहसीलदार समीर माने

Advertisements

करमाळा प्रतिनिधी

तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत आरोग्यसेवा पोचवण्याचे काम शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे, हा उपक्रम कौतुकास्पद असून याच्या माध्यमातून शासनाच्या सर्व आरोग्य संदर्भातील योजना जनतेपर्यंत पोचल्या पाहिजेत असे मत तहसीलदार समीर माने यांनी व्यक्त केले.

शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्यावतीने करमाळा शहरात दोन दिवसीय मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .या शिबिरात रुग्णांची सर्व प्रकारची तपासणी करून मोफत चष्मे वाटप, मोफत औषधे वाटप, मोफत ईसीजी तपासणी शिवाय आवश्यक असलेल्या सर्जरीची मोफत सोय करून देण्याची जबाबदारी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने पार पाडली जात आहे. आजच्या या शिबिराचे उद्घाटन समीर माने यांच्या हस्ते झाले.

शिवाय गरजू रुग्णांना महागड्या शस्त्रक्रिया मोफत करून देण्यासाठी शिवसेना वैद्यकी मदत कक्षाच्या माध्यमातून मदत केली जाते.
आज पहिल्या दिवशी 340 रुग्णांनी नोंदणी केली असून उद्या मंगळवारी किमान एक हजार रुग्ण तपासणी करून मोफत चष्म्याचा लाभ घेतील असा विश्वास शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आलेला आहे.

मंगळवारी 19 एप्रिल रोजी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर उद्या दुपारी तीन वाजता करमाळा येथे या शिबिराचा समारोप कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असून सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Related Stories

कोरोनामुळे इंडिया ओपन आणि सैयद मोदी इंटरनॅशनल टूर्नामेंट रद्द

Rohan_P

देशिंग तलाठी व कोतवाल लाचलुचपतच्या जाळ्यात

Abhijeet Shinde

नगरमध्ये युद्धप्रात्यक्षिकांचा थरार

prashant_c

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या  9 हजार 915 वर

Rohan_P

महाराष्ट्रात 17,433 नवे कोरोना रुग्ण ; 292 मृत्यू

Rohan_P

देशात ‘आंदोलनजीवी’ जमातीचा उदय, जनतेनं सावध रहावं : पंतप्रधान

Abhijeet Shinde
error: Content is protected !!