Tarun Bharat

मुरुगा मठाचे महंत शिवमूर्ती शरनारू यांना बलात्कार प्रकरणी अटक

ऑनलाईन टीम/तरुण भारत

Shivamurthy Murugha Sharanaru arrested: कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील मुरुगा मठाचे महंत शिवमूर्ती मुरुघ शरनारू यांना बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. मठाच्याच हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवमूर्ती मुरुघ शरनारू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपीला चित्रदुर्ग जिल्हा कारागृहात आणण्यात आले असून त्याला न्यायालयात हजर केले जाईल, यावेळी पोलिसांकडून त्याच्या कोठडीची मागणी केली जाईल. आरोपी महंत आणि त्यांच्या इतर चार साथादारांविरुद्ध पॉक्सो (POCSO), अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा आणि भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून राज्यातही राजकारण तापले आहे.

दरम्यान, मुरुगा शरनारू यांनी अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती. मात्र चित्रदुर्गाच्या न्यायालयाने आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी गुरुवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. याप्रकरणी अधिक माहिती देत पोलिसांनी सांगितले की, विहित प्रक्रियेनुसार आरोपीला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. यासोबतच प्रक्रियेनुसार वैद्यकीय चाचणीही करण्यात आली आहे. मंगळवारी चित्रदुर्ग येथील जिल्हा सत्र न्यायालयाने मुरुगा मठाच्या मुख्य पुजाऱ्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 1 सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली.

दरम्यान, शिवमूर्ती शरनारू यांना अटक करण्याच्या आदल्या दिवशी पोलिसांनी हॉस्टेलची वॉर्डन रश्मी हिला ताब्यात घेतलं होतं. म्हैसूर शहर पोलिसात दोन अल्पवयीन मुलींना शिवमूर्ती यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पीडित अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करण्यात येत होते असा आरोप स्वयंसेवी संस्थेकडून करण्यात आला आहे. लिंगायत मठाद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळेत दोन्ही अल्पवयीन मुली शिकतात. त्यांनी म्हैसूरमधील एका सेवा संस्थेशी संपर्क साधत त्यांच्याबाबत घडलेला प्रकार सांगितला होता. त्यानंतर संस्थेने ही गोष्ट जिल्हा बालकल्याण समितीच्या नजरेस आणून दिली आणि पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुरुगा मठाकडून चालवल्या जाणाऱ्या वसतिगृहात १५ आणि १६ वर्षांच्या मुलींचे गेल्या साडे तीन वर्षांपासून लैंगिक शोषण करण्यात आल्याचा आरोप आहे.

Related Stories

बेंगळूरमध्ये बाहेरून येणाऱ्यांना १ एप्रिलपासून आरटी-पीसीआर अहवाल अनिवार्य

Archana Banage

तृणमूल काँग्रेसचे आमदार तमोनाश घोष यांचे कोरोनामुळे निधन

Tousif Mujawar

अकरावीची सीईटी रद्द ! हायकोर्टाने दिलेला निर्णय आम्ही तपासून पाहू : वर्षा गायकवाड

Tousif Mujawar

संकटात असलेल्या टेलिकॉम कंपन्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाचा दिलासा

Archana Banage

‘देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेतृत्व संपविले’

Archana Banage

फायझर कंपनीची लस मुलांसाठी सुरक्षित

Patil_p