बेळगावच्या श्रेया पोटेची अष्टपैलू खेळी
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
महिलांच्या 15 वर्षाखालील एकदिवशीय चषक क्रिकेट स्पर्धेत कर्नाटक संघाने एनसीए संघाचा 9 गड्यांनी पराभव करुन विजय मिळविला. बेळगावच्या श्रेया पोटेने या सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली.
प्रथम फलंदाजी करताना एनसीएने 35 षटकात 9 गडी बाद 109 धावा केल्या. त्यात एनसीएतर्फे नुझमीन खातूनने 74 धावा केल्या. कर्नाटकतर्फे वेदिता रावने 3, श्रेया पोटेने 2, सानिका कपूर व रिमझीम शुल्काने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्नाटक संघाने 13.3 षटकात 1 गडी बाद 113 धावा करुन सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात लावण्याने नाबाद 32 तर इंचराने नाबाद 27 तर श्रेया पोटेने 26 धावा केल्या.