पुलाची शिरोली/ वार्ताहर
Karnataka bus accident on Pune-Bangalore highway : पुणे–बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर टोप-संभापूरजवळ भरधाव कर्नाटक बस उलटून झालेल्या अपघातात एक ठार. तर सहाजण जखमी झाले. सुधीर भाऊसाहेब पाटील वय ३२ रा. कुल, ता.निपाणी, जि. बेळगाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हा अपघात सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडला. जखमींवर कोल्हापूरातील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुणे येथून बेळगावकडे निघालेली कर्नाटक डेपोची बस प्रवाशी घेवून जात होती. सोमवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास टोप गावच्या हद्दीत आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटून बस रस्त्याच्या कट्याला धडकून पलटी झाली.
हे ही वाचा : फिल्मी स्टाईलने पाठलाग करत तिघा मोटारसायकल चोरट्यांना केलं जेरबंद
या अपघातात बसमधील सुधीर पाटील याचा मृत्यू झाला. तर मौला आबालाल बागवान, रा. चिक्कोडी, रोहिणी मारूती कदम रा.बसर्गे, ईशा बाळासाहेब कांबळे, रा. पुणे, चंद्रशेखर लक्ष्मण गावडे रा. पुणे, रूकय्या बाळून हुसेन सौदागर रा. बेळगांव, वाहक रविकुमार हे जखमी झाले आहेत. चालक शंकरगौंडा भरमागौडा पाटील रा. जि. हावेरी, कर्नाटक याने निष्काळजीपणे गाडी चालवल्याने अपघात झाला, अशी फिर्याद सिध्देश्वर पुजाप्पा सुनगार (वय ४८ रा. जोशी, ता.धारवाड) याने शिरोली पोलीस ठाण्यात दिली आहे.