बेंगळूर : कर्नाटक मंत्रीमंडलाच्या विस्ताराचे संकेत मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिले आहेत. आपले वरिष्ठ नेतृत्व गुजरात निवडणुकीमध्ये व्यस्त असल्याने निवडणुका संपताच कर्नाटक मंत्रीमंडळाच्या विस्तारात लक्ष घालतील. असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी म्हटले आहे. गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार असून, 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल होत नसल्याने मुख्यमंत्री बोम्माई यांच्यावर गेल्या काही काळापासून टिका होत आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी नव्या चेहऱ्यांसाठी संधी देण्यासाठी कर्नाटक भाजप सरकार चाचपणी करत आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांनी नुकतेच सांगितले की, मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी ते लवकरच पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेण्यासाठी नवी दिल्लीला जाणार आहे.

