बेंगळूर : चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेट येथील एका गावात आयोजित कार्यक्रमात एक महिला तक्रार सोडवण्यासाठी मंत्र्याना विनवणी करत असताना मंत्र्याने महिलेला कानशिलात मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कर्नाटक राज्याचे पायाभूत सुविधा मंत्री असलेले व्ही सोमन्ना यांनी एका महीलेला कानशिलात लगावली.
ही घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर माध्यमाध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी मंत्री व्ही. सोमन्ना यांच्याकडून घटनेचे स्पष्टीकरण मागितले आहे. व्ही सोमन्ना यांनी सोमवारपर्यंत त्यांच्या कृतीचे स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे.
महिलेने असा दावा केला आहे की, जमिनीच्या कागदपत्रांचे वितरण करण्यासाठी लाभार्थ्यांची ओळख पटवताना हेराफेरी करण्यात आली असून तिलाही भूखंड मिळावा याची विनंती मंत्र्यांकडे करत होती.

