Tarun Bharat

सोशल मीडिया पोस्टवरून हुबळीमध्ये हिंसाचार; १२ पोलीस जखमी

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील जुन्या हुबळी पोलीस स्टेशनवर काल (शनिवार) रात्री जमावाने केलेल्या दगडफेकीत १२ जण जखमी झालेत. तर या घटनेनंतर ४० जणांना अटक करण्यात आली आहे. दगडफेकीवेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या गोळ्यांचा वापर केला.

हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त लाभ राम म्हणाले की, या हिंसाचाराच्या घटनेत सहभागी असलेल्यां आरोपींविरुद्ध सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. जमावाने पोलिसांच्या वाहनांचेही नुकसान करण्याचा प्रयत्न केला.

एका व्यक्तीने सोशल मीडियावर मुस्लिम समुदायाला लक्ष्य करून आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती, ज्यावर इतरांनी आक्षेप घेत पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. परंतु कारवाईवर समाधान न झाल्याने मध्यरात्री पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने तक्रारदार जमा झाले आणि त्यांनी गोंधळ घातला. मात्र या गोंधळाने अगदी हिंसक वळण घेतले. यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

त्याचवेळी राज्याचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र म्हणाले की, “या हिंसाचारात एका पोलीस अधिकाऱ्याची प्रकृती चिंताजनक असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या काही लोकांना अटक करण्यात आली आहे. हा एक पूर्व नियोजित हल्ला होता.

Related Stories

अंत्यसंस्काराला नकार, श्राद्धाकरता 150 जण पोहोचले

Patil_p

कर्नल पुरोहित प्रकरणी त्वरेने निर्णय द्या!

Patil_p

हिंगोलीत पूरस्थिती, मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतून घेतला आढावा

datta jadhav

बद्रीनाथ, केदारनाथ येथे दरदिनी 3 हजार भाविकांना अनुमती

Patil_p

कहाणी भारतातील एका अनोख्या गावाची

Patil_p

कसाबला ओळखणाऱया व्यक्तीची दुर्दशा

Patil_p
error: Content is protected !!