वृत्तसंस्था/ बेंगळूर
रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात उत्तरप्रदेश संघावर कर्नाटकाने खेळाच्या दुसऱया दिवसाअखेर 198 धावांची आघाडी मिळविली. या सामन्यातील दुसरा दिवस गोलंदाजांनी गाजविला. दिवसभरात 18 गडी बाद झाले.
यजमान कर्नाटकाने 7 बाद 213 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांचा पहिला डाव 84 षटकांत 253 धावांत आटोपला. कर्नाटकाच्या शेवटच्या तीन फलंदाजांनी 40 धावांची भर घातली. श्रेयस गोपालने 80 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 56 तर रविकुमार समर्थने 10 चौकारांसह 57, कृष्णमूर्ती सिद्धार्थने 4 चौकारांसह 37, कर्णधार मनिष पांडेने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 27 धावा जमविल्या. उत्तरप्रदेशतर्फे सौरभ कुमारने 4, मानवीने 3 आणि दयालने 2 गडी बाद केले.
कर्नाटकाच्या भेदक गोलंदाजीसमोर उत्तरप्रदेशचा पहिला डाव 37.3 षटकांत 155 धावांत आटोपला. उत्तरप्रदेशच्या डावामध्ये गर्गने 7 चौकारांसह 39, रिंकु सिंगने 6 चौकारांसह 33, मानवीने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 32, दयालने 1 षटकार आणि 1 चौकारांसह 13, रजपूतने 1 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 18 धावा जमविल्या. कर्नाटकातर्फे रोनित मोरेने 47 धावांत 3 तर विजयकुमार वैशाख, करिअप्पा, के. गौतम यांनी प्रत्येकी 2 आणि श्रेयस गोपालने 1 बळी मिळविला.
कर्नाटकाने पहिल्या डावात 98 धावांची आघाडी घेतल्यानंतर त्यांचा दुसरा डाव कोलमडला. दुसऱया दिवसाअखेर कर्नाटकाने दुसऱया डावात 34 षटकांत 8 बाद 100 धावा जमविल्या. कर्नाटकाच्या दुसऱया डावात अगरवालने 5 चौकारांसह 22, समर्थने 11, करूण नायरने 10, सिद्धार्थने 15 आणि शरथ 10 धावावर खेळत आहे. उत्तरप्रदेशतर्फे सौरभकुमारने 3, रजपूतने 2, यादव आणि मावी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. कर्नाटकाने उत्तरप्रदेशवर 198 धावांची आघाडी घेतली असून त्यांचे 2 गडी खेळावयाचे आहेत.
संक्षिप्त धावफलक कर्नाटक प. डाव- 84 षटकांत सर्वबाद 253 (समर्थ 57, श्रेयस गोपाल नाबाद 56, सिद्धार्थ 37, नायर 29, मनिष पांडे 27, सौरभकुमार 4-73, मावी 3-60, दयाल 2-43, रजपूत 1-42), उत्तरप्रदेश प.डाव- 37.3 षटकांत सर्वबाद 155 (गर्ग 39, रिंकु सिंग 33, मावी 32, रोनित मोरे 3-47, वैशाख, कावेरअप्पा, गौतम प्रत्येकी दोन बळी, गोपाल एक बळी), कर्नाटक दु. डाव- 34 षटकांत 8 बाद 100 (अगरवाल 22, सिद्धार्थ 15, समर्थ 11, शरथ खेळत आहे 10, सौरभकुमार 3-32, रजपूत 2-15, यादव आणि मावी प्रत्येकी एक बळी