Tarun Bharat

कर्नाटकाने जपली दसऱयाची वैभवशाली परंपरा

Advertisements

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे उद्गार ः म्हैसूर दसरोत्सवाचे उद्घाटन

प्रतिनिधी/ बेंगळूर

विश्वविख्यात म्हैसूर दसरोत्सवाला सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. चांदीच्या रथातील चामुंडेश्वरी देवीच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दसरोत्सवाचे उद्घाटन केले आणि देवीची कृपादृष्टी सर्वांवर राहू दे, अशा भावना व्यक्त केल्या. म्हैसूर दसरा हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. बदलत्या काळातही कर्नाटकाने दसऱयाची वैभवशाली परंपरा जपली आहे. त्यामुळे आपल्याला आनंद होत आहे, असे उद्गार राष्ट्रपती मुर्मू यांनी काढले.

म्हैसूर दसरोत्सवाला चालना दिल्यानंतर त्या म्हणाल्या, राज्यात आदी शंकराचार्य, बसवेश्वर, अल्लमप्रभू, अक्कमहादेवी यांचे समाजनिर्मितीत मोठे योगदान आहे. बसवेश्वरांचे वचन आजही लोकशाहीसाठी प्रेरणास्थान आहे. राणी चन्नम्मा, अब्बक्का देवी, ओनके ओबव्वा या आजही महिलांसमोर आदर्श आहेत. महिलांच्या प्रगतीसाठी आणखी बळ देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादनही राष्ट्रपतींनी याप्रसंगी केले.

दसरोत्सव उद्घाटनासाठी प्रथमच राष्ट्रपतींची उपस्थिती

यावेळी प्रथमच दसरोत्सवाला राष्ट्रपतींच्या हस्ते चालना देण्यात आली. तत्पूर्वी नवी दिल्लीतून आगमन झाल्यानंतर दौपदी मुर्मू यांनी म्हैसूरच्या चामुंडी टेकडीवरील मंदिरात देवीचे दर्शन घेतले. मंदिराची पाहणी करतानाच त्याच्या इतिहासाची माहितीही त्यांनी घेतली. त्यानंतर दसरा उद्घाटन कार्यक्रमाच्या ठिकाणी राष्ट्रपतींचे आगमन झाल्यानंतर पोलीस बॅन्ड पथकाच्यावतीने राष्ट्रगीताची धून वाजविण्यात आली. म्हैसूरी फेटा घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. राष्ट्रपतींना चामुंडेश्वरी देवीची 4.25 किलो वजनाची चांदीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली.

कार्यक्रमासाठी व्यासपीठावर राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, शोभा करंदलाजे, ऊर्जामंत्री व्ही. सुनीलकुमार, म्हैसूर जिल्हा पालकमंत्री एस. टी. सोमशेखर, आमदार जी. टी. देवेगौडा आसनस्थ झाले होते.

यंदाचा उत्सव गतवैभवाची स्मरण करून देणारा ः बोम्माई

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्माई म्हणाले, यंदाचा दसरोत्सव अनेक वैशिष्टय़ांनी भरलेला आहे. गेल्या दोन वर्षांपेक्षा यंदा अत्यंत अर्थपूर्णपणे आणि गतवैभवाची आठवण करून देईल, अशा पद्धतीने दसरा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील श्रमिक वर्ग, शेतकरी, सर्वसामान्य जनतेकडून घरोघरी दसरा साजरा केला जात आहे, असे ते म्हणाले.

‘म्हैसूर सिल्क’मुळे म्हैसूरवासियांना अभिमान

म्हैसूर दसरा उत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी आलेल्या राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी म्हैसूरमध्येच तयार करण्यात आलेली जरतारी रेशमी साडी परिधान केली होती. त्यामुळे म्हैसूरवासियांचा उर अभिमानाने भरून आला. मागील आठवडय़ात नवी दिल्ली येथे म्हैसूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने निमंत्रण देताना मंत्री एस. टी. सोमशेखर यांनी राष्ट्रपतींना सन्मानाप्रित्यर्थ म्हैसूर सिल्क, फळ-पुष्प दिले होते. हीच साडी परिधान करून राष्ट्रपती दसरोत्सव उद्घाटनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. म्हैसूरचे तत्कालिन राजे नाल्वडी कृष्णराज वडेयर यांनी 1912 मध्ये स्थापन केलेल्या कारखान्यात ही साडी तयार करण्यात आली आहे, हे विशेष.

Related Stories

पंतप्रधान म्हणून मोदीच लोकप्रिय

Patil_p

देश चालविण्यासाठी संवाद आवश्यक

Patil_p

लसीकरण मोहिमेबाबत लसनिर्माते समाधानी

Patil_p

समाजवादी पक्ष उमेदवाराच्या सभा रद्द

Patil_p

सोने महागण्याचे संकेत

Patil_p

नितीश सरकारचे अजब फर्मान; सरकार विरोधात आंदोलन केल्यास नोकरी नाही!

Rohan_P
error: Content is protected !!