बेंगळूर प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने दिवंगत कन्नड चित्रपट कलाकार पुनीत राजकुमार यांना 1 नोव्हेंबर या कर्नाटक राज्य दिनी ‘कर्नाटक रत्न’ पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. लालबाग ग्लास हाऊस येथे ‘इंडिपेंडेन्स फ्लॉवर शो’चे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ही घोषणा केली. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या तयारीसाठी एक विषेश समितीही स्थापन करण्यात येणार असल्याचही त्यांनी सांगितले.
“पुनीत राजकुमार यांच्या कुटुंबातील लोकांचाही या समितीमध्ये सदस्य म्हणून समावेष केला जाईल. आम्ही सर्व मिळून हा मरणोत्तर पुरस्कार अत्यंत सन्माननीय पद्धतीने पुनीतला प्रदान करू” असे बोम्माईने पुढे सांगितले.
डॉ राजकुमार आणि पुनीत राजकुमार यांना श्रद्धांजली म्हणून या फ्लॉवर शोचे आयोजन करण्यात आले होते. या चांगल्या कामासाठी मुख्यमंत्र्यांनी फलोत्पादन मंत्री मुनीरथना आणि विभागाच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.