Tarun Bharat

कर्नाटकने सोडले जत तालुक्यात पाणी, तिकोंडी तलाव एका दिवसात ओव्हरफ्लो

जत, प्रतिनिधी

जतच्या सीमावर्ती भागातील 40 गावावर दावा करणाऱ्या कर्नाटकने बुधवारी तुंबच्या योजनेचे पाणी जत पूर्व भागात सोडले आहे.तुंबची योजना तातडीने सुरू करत यतनाळ येथील ओडापात्रातून पाणी सोडण्यात आले. यामुळे तिकोंडी येथील साठवण तलाव एका दिवसात ओवरफ्लो झाला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमाई आणि माजी जलसंपदा मंत्री एम.बी.पाटील यांनी जतच्या 40 गावांवर दावा करून महाराष्ट्रात एकच खळबळ उडवून दिली. त्यांच्या वक्तव्यानंतर जत तालुक्यात प्रचंड संताप व्यक्त होतानाच पूर्व भागाला पाण्यापासून वंचित ठेवल्याने राज्य सरकारवर देखील नाराजी व्यक्त होत आहे .

राज्य सरकार एकीकडे म्हैशाळ विस्तारित योजना पूर्ण करण्यासाठी तातडीने निर्णय घेत आहे तर याच वेळी कर्नाटकने जतच्या लोकभावनेला हात घालत थेट तुंबची योजना सुरू करून जत तालुक्यात नैसर्गिक प्रवाहातून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी तिकोंडी भागाचा दौरा आज करत आहेत. त्यामुळे
कर्नाटकातून नैसर्गिक प्रवाहातून पाणी येऊ शकते हे दाखवण्याचा देखील हा प्रयत्न असू शकतो असेही बोलण्यात येत आहे.

Related Stories

इम्रान खान यांना निवडणूक आयोगाचा दणका; 5 वर्षांसाठी ठरवलं अपात्र

datta jadhav

सांगली : मनपा क्षेत्रात बुधवारपासून सात दिवसांचा जनता कर्फ्यू

Archana Banage

Weather update: कर्नाटकात १३ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज

Archana Banage

मागील 24 तासात 2 पोलिसांचा मृत्यू; आणखी 154 कोरोनाबाधित

Tousif Mujawar

सांगलीत लॉकडाऊनचा कडक अंमल

Archana Banage

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल

Archana Banage