कुरुंदवाड ऐतिहासिक घटना कार्तिक स्वामी मंदिरात ८ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर घेता येणार दर्शन
रवींद्र केसरकर/कुरुंदवाड
मंगळवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी अर्थात कार्तिक पौर्णिमा साजरी होत असून कृतिका नक्षत्र योगावर येथील सरसेनापती संताजी घोरपडे कृष्णा पंचगंगा घाटावरील महादेव पंचायतन मंदिरातील कार्तिक स्वामी दर्शनाचा योग आला आहे. येथे सरसेनापती संताजी घोरपडे यांचे समाधीस्थळ ही आहे.
पार्वती शंकर पुत्र व देवसेनापती कार्तिक स्वामी यांच्या दर्शनाचा योग केवळ प्रयागसंगमक्षेत्रावरील असणाऱ्या कार्तिक स्वामी मंदिरातच घेता येणार आहे. येथील कृष्णा वेणा आणि पंचगंगा अशा सप्त नद्याचा प्रयाग संगम येथे झाला आहे. अशा संगमावरील कृतिका नक्षत्र वेळी कार्तिक स्वामी दर्शन घेणे भाग्याचे मानले जाते असा संदर्भ धर्म सिंधू ग्रंथात देण्यात आला आहे. यंदा ८ नोव्हेंबर रोजी हा कार्तिक स्वामी दर्शनाचा योग असून प्रयाग संगमावरील या महादेव पंचायत समिती मंदिरातील कार्तिक स्वामींचे यानंतर १२ नोव्हेंबर अखेर दर्शन घेता येणार आहे.
धर्म सिंधू ग्रंथामधील संदर्भाप्रमाणे कृष्णा पंचगंगा प्रयाग तीर्थ अर्थात कुरवपूर अर्थात आत्ताची कुरुंदवाड घाट येथे महादेव पंचायतन मंदिर आहे या प्रयागतीर्थावर कृष्णा, वेणा, भागीरथी, तुळशी, भोगावतीसह कुंभी, कासारी अशा सात नद्यांचा संगम आहे. म्हणून याला प्रयाग तीर्थ असे संबोधले जाते.
राक्षसी वृत्तीचा अविनाश करण्यासाठी भगवान शंकर यांनी सुब्रमण्यम अवतार धारण केला आणि देवसेनापती कार्तिक स्वामी यांना युद्धासाठी सज्ज केले. याच पौराणिक व ऐतिहासिक घाटावर शिवस्वराज्य संताजी घोरपडे यांच्या पूर्वजांनी पंधराव्या शतकात येथे कार्तिक स्वामी यांचे त्यांचे कुटुंब पंचायतनी हेमाडपंथी पद्धतीचे मंदिर बांधले.
दरम्यान, यावर्षी कार्तिक अर्थात त्रिपुरी पौर्णिमेपासून संकष्टीपर्यंत कार्तिक स्वामी दर्शनाचा स्त्री-पुरुष सर्वांसाठी योग आहे. यामध्ये मंगळवार दिनांक ८ नोव्हेंबर या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा योग मंगळवार दिनांक ८ नोव्हेंबर ते शनिवार दिनांक १२ नोव्हेंबर पर्यंत आहे. या काळात येथील ऐतिहासिक कुरुंदवाड घाटावरील महादेव पंचायतन मंदिरातील कार्तिक स्वामींचे दर्शन सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांना दर्शन घेता येणार आहे.
कर्तिक स्वामी दर्शन योगाच्या पार्श्वभूमीवर सुब्रमण्यम मंदिर प्रशासन समिती मार्फत सुलभ दर्शनाची सर्व तयारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर यानिमित्त मंदिराची रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, मंडप, दर्शन मंडप याची सर्व सज्जता करण्यात आली असल्याची माहिती मंदिराचे पुजारी जयंत हुद्दार तसेच इतिहास अभ्यासक मंदिर समिती कार्याध्यक्ष शशिकांत पाटील यांनी दिली.
कार्तिक स्वामींचे दर्शन स्त्रियांनी इतर वेळी घेऊ नये अशी आख्यायिका आहे. मात्र भारत खंडात स्त्रियांसह सर्वांनी कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावे अशी दोनच मंदिरे आहेत तामिळनाडूतील पटणी व येथील ऐतिहासिक कुरुंदवाड घाटावर दक्षिण भारतातील हे एकमेव कार्तिक स्वामी मंदिर आहे.
संपूर्ण मोफत वैद्यकीय शिबिर
श्री सुब्रमण्यम महादेव पंचायतन देवस्थान, सरसेनापती संताजी घोरपडे समाधी घाट विकास कृती समिती यांच्यावतीने व श्री सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या सहकार्याने संपूर्ण वैद्यकीय तपासणी व शस्त्रक्रिया नोंदणी , दंत तपासणी, हृदयरोग तपासणी व मोफत ईसीजी, नेत्ररोग तपासणी या विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन कार्तिक स्वामी दर्शन योगावर मंगळवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी संपूर्ण दिवसभर करण्यात आले आहे अशी माहिती यावेळी जयंत खुद्दार व शशिकांत पाटील यांनी दिली.