प्रतिनिधी / बेळगाव
लेडी लायन्स ग्रुप आनंदवाडी यांच्यावतीने कार्तिक दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गल्लीमध्ये भव्य रांगोळय़ांचे प्रदर्शन करण्यात आले होते.
आनंदवाडी येथील महादेव मंदिर आणि बसवाण्णा मंदिर या ठिकाणी कार्तिक आणि दीप लावून पूजन व आरती करण्यात आली. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून महाराजांना सर्व महिलांनी दीप ओवाळून कार्यक्रम मोठय़ा उत्साहाने पार पाडला.
यावेळी नवदुर्गा ग्रुपच्या सर्व महिलांनी उपस्थिती दर्शविली होती. कार्यक्रमाकरिता गल्लीतील बऱयाच नागरिकांनी देणगी देऊन सहकार्य केले. त्याकरिता लेडी लायन्स ग्रुपच्या संस्थापिका समाजसेविका माधुरी जाधव-पाटील यांनी सर्व देणगीदारांचे आभार मानले. या कार्यक्रमाकरिता नवदुर्गाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.