जीएसएस कॉलेजच्या वनस्पती शास्त्र विभागातर्फे निरीक्षण : विद्यार्थ्यांना दुर्मीळ निसर्ग निरीक्षणाच्या संधी
प्रतिनिधी /बेळगाव
अतिशय दुर्मीळ अशा सोळा ते अठरा वर्षांनी फुलणाऱया कार्वीची नोंद जीएसएस कॉलेजच्या वनस्पती शास्त्र विभागातर्फे केली गेली. आंबोली व गेळे गावामध्ये सध्या 16-18 वर्षांनी फुलणाऱया आणि केवळ कडेकपारीवर उगवणाऱया कारवीच्या झुडुपांची फुले फुलली आहेत.
आंबोलीचा परिसर हा निसर्गरम्य ठिकाणांसाठी सर्वपरिचित असून येथे 5 पेक्षा जास्त कारवीच्या जातींची नोंद झाली आहे. सर्व जातींच्या कारवीच्या फुलण्याचा कालावधी आणि अधिवास वेगवेगळा आहे. काही जाती दर 3 वर्षे, 5 वर्षे, 7 वर्षे, 13 वर्षे, 16 वर्षे अशा कालांतराने बहरतात. त्यामधील स्ट्रॉबीलांथस स्क्रोबिकूलाटा , जी सपुष्पा नावानेसुद्धा ओळखली जाते. ती तब्बल 16-18 वर्षांनी फुलते.
ही प्रजाती अतिशय दुर्मीळ असून महाराष्ट्र-गोवा-कर्नाटकातील पश्चिम घाटातल्या कडेकपारीवरच वाढते. या कारवीला जेव्हा फुलोरा येतो तेव्हा त्याची पाने गळून पडतात आणि झुडूप फुलांनी भरलेले दिसते. गतवषी ही प्रजाती याच काळात महाबळेश्वरला फुलली होती. एकदा फुलल्यानंतर 3-4 आठवडे हा फुलोरा पाहायला मिळू शकतो. सर्व झुडुपे एकाचवेळी फुलत असल्याने संपूर्ण कडय़ाला निळय़ा रंगाची छटा येते.
इंग्रज अधिकारी डॅल्झेल याने त्याच्या कार्यकाळादरम्यान महाबळेश्वरमधून सर्व प्रथम 1884 मध्ये या प्रजातीचा शोध लावला होता. त्याच्या मताप्रमाणे सपुष्पा ही कारवी कुळातील सर्वात सुंदर दिसणारी प्रजाती आहे. त्यानंतर पश्चिम घाटातील मोजक्मयाच ठिकाणांहून या प्रजातीची नोंद केली गेली आहे. 16-18 वर्षांनी फुलण्याच्या स्वभावामुळे या जातीबद्दल अतिशय कमी प्रमाणात माहिती उपलब्ध आहे. अशा दुर्मीळ प्रजातींच्या संवर्धनासाठी त्यांचा सखोल अभ्यास, प्रचार होण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्याची गरज असल्याचे जीएसएस कॉलेज, बेळगावच्या वनस्पती शास्त्र विभागातर्फे नमूद करण्यात आले. जीएसएस कॉलेजच्या वनस्पती शास्त्र पदव्युत्तर विभागाच्या प्राध्यापक ऋतुजा कोलते-प्रभूखानोलकर आणि 20 विद्यार्थ्यांनी नुकतीच यासंबंधीची निरीक्षणे अभ्यास भेटी दरम्यान नोंदविली. कॉलेजचे प्राचार्य बी. एल. मजूकर आणि विभाग प्रमुख प्रा. दळवी सरांच्या विशेष प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांना दुर्मीळ निसर्ग निरीक्षणाच्या संधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले.