कासारवेलीतील तरूणाची रत्नागिरी शहर पोलिसांकडे तक्रार; सोलापूरमधील व्यक्तीच्या बँक खात्यावर केले पैसे जमा
रत्नागिरी प्रतिनिधी
पुण्यातील ऍक्सीस बँकेतून 8 लाखाचे कर्ज मंजूर करण्यासाठी रत्नागिरीनजीकच्या कासारवेलीतील एका तरूणाने कर्जाच्या रक्कमेपेक्षा तब्बल 9 लाख 26 हजार रुपये सोलापूरमधील एकाच्या खात्यावर जमा केल्याची बाब समोर आली आहे. पण कर्जासाठी पैसे जमा करूनही कर्ज मंजूर न झाल्याने या फसवणुकीने गळीतगात्र झालेल्या तरूणाने रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तकार दाखल केली आहे.
दिवसागणिक ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यामध्ये उच्चशिक्षित असलेली लोकं आŸनलाईन फसवणुकीचे बळी पडत असल्याची बाब पकर्षाने समोर येत आहे. शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साई आनंद प्रसादे (34, रा. कासारवेली) यांनी शहर पोलीस स्थानकात तकार दिली. साई यांना राजेश नडीमेटला (रा. सोलापूर) या व्यक्तीने पुण्यातील ऍक्सीस बँकेतून 8 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करुन देतो, असे सांगितले होते. नडीमेटच्या बोलण्यावर पसादे याने विश्वास ठेवला. मागील 22 मार्च ते सप्टेंबर 2022 या मुदतीअखेर तब्बल 9 लाख 26 हजार रुपये कर्ज मंजूर करण्यासाठी पसादे यांनी नडीमेटच्या बँक खात्यावर जमा केले होते.
पैसे बँक खात्यावर जमा करूनही कर्ज मंजूर झालेले नाही. त्यामुळे आपली फसगत झाल्याचे कळताच साई प्रसादे यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. 8 लाखांच्या कर्जासाठी त्यांनी तब्बल 9 लाख 26 हजार रुपये संबंधित व्यक्तीला दिल्याची तकार समोर येताच पोलीसही अवाप् झाले आहेत. शहर पोलिसांनी राजेश नडीमेटला या संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे करत आहेत.