ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आ. मुक्ता टिळक यांच्या निधनाने कसबा विधानसभेची तर आ. लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने चिंचवड विधानसभेची जागा रिक्त आहे. या दोन्ही जागांसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे.
३१ जानेवारी रोजी या निवडणूकीसाठीची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. ७ फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. ८ फेब्रुवारीला अर्जांची छाननी तर १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. २७ फेब्रुवारीला या दोन्ही पोटनिवडणूकांसाठी मतदान होणार आहे. २ मार्चला या निवडणूकीचा निकाल जाहीर होईल.