Tarun Bharat

भाविकांना करता येणार काशी दर्शन

राज्य सरकारतर्फे भारत गौरव काशी दर्शन यात्रा

प्रतिनिधी/ बेळगाव

काशी दर्शन करू इच्छिणाऱया भाविकांसाठी कर्नाटक राज्य सरकारने ‘कर्नाटक भारत गौरव काशी दर्शन’ ही योजना आखली आहे. कर्नाटक राज्य सरकार व आयआरसीटीसी यांच्या संयुक्त विद्यमाने काशी दर्शन रेल्वे सोडली जाणार आहे. अयोध्या, वाराणसी, प्रयागराज या शहरांचा यामध्ये समावेश असणार आहे. राज्यातील 30 हजार भाविकांना यात्रेसाठी प्रत्येकी 5 हजार रुपये सरकारी अनुदान दिले जाणार आहे.

काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारकडून काशी दर्शन या योजनेची घोषणा करण्यात आली होती. भारतीय रेल्वे व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने भारत गौरव उपक्रमांतर्गत काशी दर्शन योजनेची आखणी करण्यात आली आहे. भाविकांना अत्यंत माफक दरात काशी दर्शन व्हावे, यासाठी योजना सुरू करण्यात आली. 20 हजार रुपये यात्रेसाठी आकारले जाणार असून त्यावर प्रत्येक प्रवाशाला 5 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येकी 15 हजार रुपयांमध्ये काशी दर्शन करता येईल. रेल्वेला स्लीपर व एसी कोच देण्यात येणार आहेत.  

8 दिवस व 7 रात्री असा एकूण प्रवास असणार आहे. बेंगळूर येथून निघालेली एक्स्प्रेस वाराणसी, अयोध्या, प्रयागराज व पुन्हा बेंगळूर असा प्रवास करणार आहे. 11 नोव्हेंबर रोजी काशी दर्शनासाठी एक्स्प्रेस निघणार आहे. वाराणसी येथील तुळसी मानस मंदिर, संकटमोचन हनुमान मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर, गंगा आरती येथे भेट देता येईल. अयोध्या येथे राम जन्मभूमी मंदिर, हनुमान गुडी व शरयू घाट पाहता येईल. प्रयागराज येथील गंगा-यमुना संगम, हनुमान मंदिर भाविकांना पाहता येणार आहे.

बेंगळूर-काशी या मार्गावर रेल्वे सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. ही मागणी अखेर मान्य झाली असून काशी दर्शनामुळे भाविकांना परवडणाऱया दरात देवदर्शन करता येईल. बेंगळूर, बिरूर, हावेरी, हुबळी, बेळगाव व रायबाग या रेल्वेस्थानकांतून ‘काशी दर्शन’ रेल्वेमध्ये भाविकांना चढता येईल. सेवा सिंधू वेबसाईटवर जावून या विषयीची अधिक माहिती जाणून घेऊ शकता. तसेच आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर जावून नागरिकांना बुकिंग करता येईल.  

Related Stories

बेळगावातील येळ्ळूरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खळबळ

Patil_p

विविध मागण्यांसाठी पोस्टमनची निदर्शने

Amit Kulkarni

ग्रामीण भागात रुग्ण संख्या घटली

Patil_p

ज्येष्ट वकील एस.बी.शेख यांना कॅलिफोर्निया विद्यापीठाची डॉक्टरेट

Amit Kulkarni

लोकशिक्षण देण्याचा आजतागायत प्रयत्न

Omkar B

डासांच्या प्रादुर्भावामुळे अनेक रोग उद्भवण्याची शक्मयता

Amit Kulkarni